पराभवामुळे कर्जमाफीची चर्चा - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

माळेगाव - 'कांदा, साखर, दुधासह शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा सरकारविरुद्ध उद्रेक झाला. भाजप सरकारचा पाडाव करण्यासाठीच पाच राज्यांच्या निवडणुकांत शेतकऱ्यांनी निर्णायक भूमिका घेतली. त्यामुळेच आता केंद्राकडून पुन्हा कर्जमाफीची चर्चा केली जात आहे. गमावलेला जनाधार मिळविण्याचा केविलवाणा प्रकार भाजपवाल्यांकडून केला जात आहे,'' असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

पणदरे- कुरणेवाडी (ता. बारामती) येथे उद्योजक नितीन जगताप यांच्या "उत्कर्ष लॉन्स' या नवीन मंगल कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात अजित पवार बोलत होते ते म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणुकांची दिशा अद्याप स्पष्ट नाही. साहेब अथवा माझे नाव घेऊन पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा करू नका. मित्रपक्षांना बरोबर घेऊन भाजप व शिवसेनेचे जातीयवादी सरकार घालवून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुमत मिळविण्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित करावे.

Web Title: Debt Loanwaiver Discussion Ajit Pawar Politics