उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्तेचे विकेंद्रीकरण

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 जानेवारी 2020

चांगलं काम करू - आदित्य ठाकरे
कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना पर्यावरण आणि पर्यटनमंत्री हे पद देण्यात आले आहे. ‘चांगली लोकं सोबत आहेत, त्यामुळे चांगलं काम करू,’ असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी खातेवाटपानंतर व्यक्त केला आहे. आवडीची खाती मिळाली, याचा आनंद आहे. या खात्यांवर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. या विभागात महाराष्ट्रासाठी खूप काम करण्याची संधी आहे. सर्वांच्या सूचनेनुसार काम करीन. सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा विकास करू, याची खात्री आहे, असेही आदित्य म्हणाले.

मुंबई - महाविकास आघाडी सरकारचे आज खातेवाटप करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे मोठी खाती न ठेवता शिवसेनेसह मित्रपक्षांच्या मंत्र्यांना महत्त्वाच्या खात्यांचे वाटप करीत सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, शिवसेनेत क्रमांक दोनचे मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास हे संवेदनशील खाते देऊन त्यांच्यावर विश्‍वास दाखविला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री प्रशासनाचे प्रमुख असल्याने त्यांच्याकडे सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क आणि विधी व न्याय विभाग असतात. उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या या खात्यांसह माहिती व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी आहे. या आधीच्या अनेक सरकारांमध्ये नगरविकास खाते स्वतःकडे ठेवण्याची मुख्यमंत्र्यांची परंपरा उद्धव ठाकरे यांनी या वेळी मोडीत काढली आहे. नगरविकास खाते अत्यंत संवेदनशील मानले जाते. या खात्यात काही अनुचित प्रकार घडल्यास थेट मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्‍यात येत असते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी हे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविले आहे.

सहकारी साखर कारखान्यांच्या नोकरभरतीला मनाई 

महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असल्याने या दोन्ही पक्षांच्या वाट्याला मोठी खाती देण्यात आली आहेत. गृह खाते सुरुवातीला शिवसेनेकडे असताना ठाकरे यांनी ते राष्ट्रवादीला दिले आहे. तसेच, मोठ्या खात्यांसाठी स्वतःच्या पक्षात नाराजी ओढविण्याची शक्‍यता असतानाही त्यांनी दोन्ही काँग्रेसच्या मंत्र्यांकडे महत्त्वाची खाती देत मित्रपक्षांवर विश्‍वास दाखविला आहे. मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांना अधिकार देण्याचा निर्णयही उद्धव ठाकरे घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने सत्तेचे विकेंद्रीकरण केल्याचे मानण्यात येते.

अखेर 'त्या' शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!

महाराष्ट्राला आता शांत झोप लागेल. भाजपचे लोक निराशेच्या गर्तेत अडकले आहेत. सत्ता गेल्यानंतर भाजपला मानसिक धक्‍का. नूतन मंत्री नंबर एकचे काम करणार.
- शंभूराज देसाई, शिवसेना, गृहराज्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decentralization of power by Uddhav Thackeray