राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

वृत्तसंस्था
Wednesday, 12 February 2020

ठाकरे सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज (ता. १२) पार पडली. या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता ५ दिवसांचा आठवडा असेल

मुंबई : ठाकरे सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज (ता. १२) पार पडली. या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता ५ दिवसांचा आठवडा असेल. अनेक दिवस प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाला आज अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळाली. २९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमवबजावणी करण्यात येईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील अनेक वर्ष राज्य सरकारचे कर्मचारी प्रतिनीधी पाच दिवसांचा आठवडा व्हावा यासाठी पाठपुरावा करत होती. मात्र, काही ना काही अडचणींमुळे हा निर्णय होऊ शकला नव्हता. आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.  

5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था प्रत्यक्षात आणण्यासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची : राष्ट्रपती

नुकत्याच सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी चर्चा करण्यात आली होती. अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस विनायक लहाडे, डॉ. सोनाली कदम, तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव नितिन गद्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे व इतर काही अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. याच बैठकीत हा निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decision of 5 days week taking in cabinate meeting