esakal | 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था प्रत्यक्षात आणण्यासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची : राष्ट्रपती
sakal

बोलून बातमी शोधा

President Ramnath Kovind speaks at NIBM Program Pune

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक
देशाच्या एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के लोक हे दिव्यांग आहे. बँकिंग क्षेत्राने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची कामगिरी केली पाहिजे.

5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था प्रत्यक्षात आणण्यासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची : राष्ट्रपती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारताचे 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यामध्ये बँकांची महत्त्वाची भूमिका आहे. बँकिंग व्यवस्थेमध्ये झालेल्या आमूलाग्र बदलामुळे आज ग्रामीण भागापर्यंत बँकिंग सेवा पोचली आहे, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नॅशनल इस्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड मॅनेजमेंटच्या (एनआयबीम) गोल्डन ज्युबली कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास उपस्थित होते.

अरविंद केजरीवाल 'या' दिवशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

अर्थव्यवस्थेत बँकांचे महत्त्वाची योगदान असते. बँका लोकांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी बँकिंग क्षेत्रासमोर अनेक आव्हाने होती. त्यावेळी ग्रामीण भागात बँकिंग व्यवस्था पोचली नव्हती. मात्र एनआयबीएमसारख्या संस्थांनी चांगल्या प्रशिक्षित आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची निर्मिती करून बॅंकिंग व्यवस्था बळकट केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी बँकांच्याजेवढ्या शाखा होत्या तेवढ्या शाखा आता बँकांकडून दरवर्षी सुरू केल्या जातात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ग्रामीण भागात मुख्यतः गरीब लोकांना बँकिंग सेवा उपलब्ध होत नव्हती. मात्र जनधन योजनेमुळे बँकिंग सेवा तळागाळात पोहोचली आहे. जनधन योजनेअंतर्गत आतपर्यंत 35 कोटी खाती उघडण्यात आली आहे. शिवाय मुद्राच्या माध्यमातून बँकांनी गरजू उद्योजकांना निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. देशातील शेवटच्या नागरिकापर्यंत बँकांनी बँकिंग सेवा पोचवणे आवश्यक आहे.

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक
देशाच्या एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के लोक हे दिव्यांग आहे. बँकिंग क्षेत्राने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची कामगिरी केली पाहिजे.