
Maharashtra Tourism Impact: औरंगजेबाच्या कबरीवरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापले आहे. नागपूरमध्येही औरंगजेबाच्या राडा झाला. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद ने राज्य सरकारकडे औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी केली होती. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. पण या सगळ्यात हिंदू धार्मिक स्थळांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तसेच पर्यटकांची संख्याही घटली आहे. याचा आर्थिक फटका पर्यटनाची राजधानी छत्रपती संभाजीनगरला मोठ्या प्रमाणात बसत आहे.