
नागपूर : परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील रहिवासी २५ वर्षीय दीपक दराडे याच्या अवयवदानामुळे मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथील एकूण पाच जणांना जीवनदान मिळाले. विशेष असे की, परभणीवरून नागपूरपर्यंत यकृत आणण्यासाठी ४५० किमी अंतराचा ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात आला होता. या माध्यमातून पाच तासांत यकृत गरजू रुग्णापर्यंत पोहोचले. यामुळे येथील ६३ वर्षीय व्यक्तीला नवजीवन मिळाले.