
खासदारांबाबत दीपक केसरकरांचे मोठे विधान; म्हणाले...
मुंबई : शिवसेनेच्या एकूण खासदारांपैकी १४ खासदार शिंदे गटात दाखल होणार असल्याचे वृत्त आहे. हे चौदा खासदार शिंदे गटाच्या बैठकीसाठी ऑनलाइन उपस्थित होते अशीही बातमी आली. याबाबत विचारले असता प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, ‘आमच्या बरोबर सर्वच खासदार आहे’ असे मला वाटते. (Deepak Kesarkar Latest Marathi News)
एकनाथ शिंदे गटाची सोमवारी (ता. १८) बैठक पार पडली. यानंतर दीपक केसरकर यांनी पत्रकारांनी संवाद साधला. शिवसेनेच्या (shiv sena) खासदारांपैकी १४ खासदार शिंदे गटाच्या ट्रायडंट हॉटेल येथील बैठकीत ऑनलाइन उपस्थित होते अशी माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा: चेंगराचेंगरी : श्रावण सोमवारी बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात २ महिलांचा मृत्यू
शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेचे (shiv sena) खासदार एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. खासदारांच्या दबावामुळेच शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपती मुर्मू यांना मतदान केल्याचे बोलले जात आहे. खासदार फुटू नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी सावध पवित्रा घेतल्याचे म्हटले गेले.
शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर खासदारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिवसेनेचे अनेक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले गेले. यामुळे उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली. आमदारांनंतर खासदार फुटू नये यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
हेही वाचा: शिवसेनेला मोठा धक्का : माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा राजीनामा
अशात १४ खासदारांची बातमी आली. याबाबत शिवसेनेकडून अधिकृत काहीही सांगण्यात आलेले नाही. आता दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सूचक विधान केले आहे. यामुळे खासदार फुटतात की नाही हेच पाहणे बाकी आहे.
Web Title: Deepak Kesarkar Mp Shiv Sena Uddhav Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..