Deepak Kesarkar: शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीवर केसरकरांचं स्पष्टीकरण म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Group

Deepak Kesarkar: शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीवर केसरकरांचं स्पष्टीकरण म्हणाले...

शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंड करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर शिंदे गटातही कुरबुर नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. त्यावर आता शिंदेगटाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. शिंदेगटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अगदी मोजक्या शब्दात उत्तर देण्यात आलं आहे. कोल्हापूरमध्ये दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

याबाबत केसरकर बोलताना म्हणाले की, शिंदे गटातील कुणीही आमदार नाराज नाही!, असं केसरकर म्हणालेत. तर निवडीच्या फॉर्म्युल्यावरून आमच्यात कोणतही भांडण होणार नाही. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातील संवाद चांगला आहे. त्यामुळे भांडणाचा आणि नाराजीचा प्रश्नच येत नाही, असंही केसरकर म्हणालेत.

हेही वाचा: शिंदे गटातील काही नाराज आमदार पुन्हा आमच्या संपर्कात - आदित्य ठाकरे

झटपट निर्णय घेण्याची क्षमता असल्यामुळे नेते आमच्या युतीकडे येत आहेत. तर नेत्यांची पार्श्वभूमीवर पाहून त्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचंही केसरकर म्हणालेत. अनेक राजकीय पक्ष आम्हाला पाठींबा देण्याच्या तयारीत आहेत, असंही केसरकरांनी सांगितलंय.

हेही वाचा: Maharashtra Politics : CM शिंदेंना फडणवीस देणार मोठा झटका? ठाकरेंच्या दाव्यामुळे राजकीय खळबळ

तर ज्या लोकांची सत्ता गेली आहे ते आमच्यात अस्वस्थता आहे, असं म्हणणारच! किती वेळा आम्ही हे ऐकत बसायचं. आम्ही आमचं काम करत आहोत आणि करत राहणार, आमच्यावर टीका करणाऱ्यांनी लोकांच्या हिताचे अनेक निर्णय का घेतले नाही हे सांगावं. काम करणाऱ्या लोकांवर टीका का होतात. पक्षाच्या पलीकडे जाऊन लोकांची कामं करावी लागतात, असंही केसरकर म्हणालेत.