CM Shinde Illness | CM शिंदे एक-दोन तासच झोपतात; केसरकरांनी सांगितलं आजाराचं कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cm Eknath Shinde Deepak Kesarkar
CM शिंदे एक-दोन तासच झोपतात; केसरकरांनी सांगितलं आजाराचं कारण

CM शिंदे एक-दोन तासच झोपतात; केसरकरांनी सांगितलं आजाराचं कारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती सध्या बिघडली आहे. त्यामुळे त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंचे कालचे (४ ऑगस्ट) कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते. त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिंदेंच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली आहे. (Deepak kesarkar on CM Eknath shinde illness)

आपण मुख्यमंत्री शिंदेंना भेटलो आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल वाटणाऱ्या चिंतेबद्दलही कळवल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. गुरुवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. केसरकर म्हणाले, "मी त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी नियमित आरोग्य तपासणी सुरू होती. पण त्यांनी स्वतःची फार दगदग करून घेतलीये."

अपुऱ्या झोपेमुळे मुख्यमंत्र्यांना त्रास झाल्याची माहिती केसरकरांनी दिली आहे. केसरकरांनी सांगितलं की, मुख्यमंत्री शिंदे अनेक दिवस झोपलेले नाहीत. महाराष्ट्र दौऱ्यावर जाताता तेव्हा रात्री दोन-तीन वाजेपर्यंत लोक त्यांची वाट पाहत असतात. मग लोकांना न भेटता निघून जाणं त्यांना योग्य वाटत नसल्यानं ते लोकांना भेटतात. मग भेटून झाल्यावर पाच सहा वाजता झोपायचं आणि सहा सात वाजता उठायचं, असं चाललंय. एक दोन तासांची झोप कोणालाही पुरत नाही. पण मुख्यमंत्री सातत्याने मागच्या सात आठ दिवसांपासून झोपलेले नाहीत.

आपण त्यांना विश्रांती घेण्याची विनंती केल्याचंही केसरकरांनी सांगितलं आहे. आपल्या तब्येतीची काळजी घ्याल तर लोकांची अधिक चांगली सेवा करू शकाल, असं आपण मुख्यमंत्र्यांना समजावून सांगितल्याचं केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.