
दीपक पवार यांनी साम वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. त्यांनी मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांवर मत मांडलं आहे. तसेच हिंदी मराठी भाषा वादावर मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे आता चर्चा होत आहे. यावेळी बोलताना दीपक पवार यांनी सांगितलं की, या राज्याला कितीतरी भाषा आहेत. येवढ्या मुजोरपणा या राज्यामध्ये मिरा भाईंदर सारख्या ठिकाणी येतो कुठून? या राज्यामध्ये सोसायट्यांमध्ये आम्ही मराठी लोकांना राहू देणार नाही. कारण ते नॉनव्हेज खातात, असं ते म्हणाले आहेत.