Deepali Sayyad : एकनाथ शिंदेंची भेट घेतली अन् कमळाची रांगोळी काढली; राजकीय भूमिका चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepali Sayyad Eknath Shinde
Deepali Sayyad : एकनाथ शिंदेंची भेट घेतली अन् कमळाची रांगोळी काढली; राजकीय भूमिका चर्चेत

Deepali Sayyad : एकनाथ शिंदेंची भेट घेतली अन् कमळाची रांगोळी काढली; राजकीय भूमिका चर्चेत

अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांची राजकीय भूमिका सातत्याने चर्चेत येत आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर सय्यद यांनी उद्धव ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी नुकतीच एकनाथ शिंदेंचीही भेट घेतली आणि आता त्यांनी काढलेली कमळाची रांगोळी चर्चेत आली आहे.

हेही वाचा: Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिपाली सय्यद म्हणतात, ठाकरे...

दीपाली सय्यद यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर दीपाली सय्यदही ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाणार अशा चर्चा रंगत होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंविषयीची आपल्या मनातली खदखदही व्यक्त केली होती. उद्धव ठाकरेंना भेटता येत नाही, मधले लोक भेटू देत नाहीत, अशा आशयाचं विधानही दीपाली सय्यद यांनी केलं होतं.

त्यानंतर आता दीपाली सय्यद यांनी दिवाळीच्या निमित्ताने काढलेली रांगोळी चर्चेचा विषय ठरत आहे. दीपाली सय्यद यांनी घरी कमळाची रांगोळी काढली आहे. त्यामुळे आता नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट करत दीपाली सय्यद यांनी भाजपात जाण्याचे संकेत दिले आहेत, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर आता दीपाली सय्यद भाजपामध्ये जाणार की काय, अशाही चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत.

टॅग्स :BjpEknath ShindeDiwali