Deepali Sayyed: एक दिवस माझाही गट...; अंधारेंच्या एन्ट्रीनंतर दिपाली सय्यद यांचा सूचक इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepali Sayyad Sushma Andhare Uddhav Thackeray Eknath Shinde  maharashtra politics

Deepali Sayyed: एक दिवस माझाही गट...; अंधारेंच्या एन्ट्रीनंतर दिपाली सय्यद यांचा सूचक इशारा

शिवसेना विभागली गेली, शिवसेनेत दोन गट पडले आणि अशावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सिलेब्रिटी चेहरा असलेल्या दीपाली सय्यद आणि उर्मिला मातोंडकर गेल्या कुठे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात अंधारेच्या एन्ट्रीनंतर दिपाली सय्यद शिंदे गटात जाणार? अशी चर्चाही रंगली आहे. (Deepali Sayyad Sushma Andhare Uddhav Thackeray Eknath Shinde maharashtra politics )

शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांनी अगदी काही महिन्यातच आपली एक वेगळी छाप पाडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या त्या एक रणरागिणी म्हणून समोर आल्या आहेत. मात्र किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे, निलम गोऱ्हे यांच्यासोबत आतापर्यंत सेलिब्रेटी रणरागिणी म्हणून शिवसेना ठाकरे गटात वावरणाऱ्या दीपाली सय्यद आणि उर्मिला मातोंडकर नेमक्या कुठे आहेत ? असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या राजकीय भविष्याबद्दब मोठं विधान केलं आहे. ठाकरे गटाच्या सिलेब्रिटी चेहरा असलेल्या दीपाली सय्यद कुठे गायब आहेत. स्क्रिनवर येऊन टीका करणं म्हणजे सक्रिय आहे असं नाही. असं उत्तर सय्यद यांनी या प्रश्नावर दिले आहे.

नेमकं काय म्हणाल्या सय्यद?

मी स्क्रिनवर येऊन तु तु मे मे करत नाही. ज्यावेळी गरज होती तेव्हा मी केली. त्यावेळी नक्कीच सगळ्या गोष्टी मी माझ्या अंगावर घेतल्या. प्रत्येकवेळी स्क्रिनवर येऊन टीका टिप्पणी करण योग्य नाही.

सुषमा अंधारे आत्ता आत्ता सेनेमध्ये आल्या आहेत. त्यांना दाखवायच आहे की, मी सेनेमध्ये आले आहे. सेनेत माझं अस्तित्व आहे. मला सेनेत येऊन साडेतीन वर्ष झाले आहेत. मी काम करत आहे. स्क्रिनवर येऊन टीका करणं म्हणजे सक्रिय आहे असं नाही. मला दोघं एकत्र यावेत असं वाटत होत. या अशा राजकीय परिस्थितीचा कार्यकर्त्यांवर परिणाम होत असतो.

प्रत्येकजण आपापलं मत मांडत आहेत. प्रत्येक जण गट करतायत. हा माझा गट आहे हा तुझ गट आहे असं राजकारणात सुरु आहे. असं सांगताना एक दिवस माझाही गट असेल. असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

तुम्ही सध्या उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहात का असं विचारलं असता त्या म्हणाले शिवसेना कोणाची हे अजून ठरलं नाही. सध्या मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. भविष्यात तुम्हाला माझी भूमिका कळेलच.