

महाराष्ट्रात लोकसभेच्या २४ जागा वाढणार की केवळ १?; खासदार तेजस्वी सूर्या यांचा जनगणनेच्या आधारावर खळबळजनक दावा!
Sakal
पुणे : ‘‘सध्या महाराष्ट्रात ४८ लोकसभा मतदारसंघ आहेत. भाजपच्या परीसीमन (डिलिमिटेशन)च्या विधेयकाच्या प्रस्तावानुसार देशभरात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा वाढवण्याचा विचार आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रात लोकसभेच्या २४ जागा वाढू शकतात. तर जर २०२७ च्या जनगणनेनंतर पुनर्रचना झाली, तर महाराष्ट्राला केवळ एकच लोकसभा जागा वाढेल’’ असा दावा भाजप खासदार व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला. युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ, प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, प्राजक्ता जोशी, प्रणव गंजीवाले, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.