
Balasaheb Thacekray Marathi News : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्यात यावा, असे आदेश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी करणारं पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडं सुपूर्द करण्यात आलं आहे. शिवसेनेच्यावतीनं हे पत्र देण्यात आलं आहे. येत्या २६ जानेवारी रोजी अर्थात प्रजासत्ताकदिनी केंद्र सरकारकडून भारतरत्न किताबाची घोषणा होऊ शकते. यापार्श्वभूमीवरच ही मागणी करण्यात आली आहे.