राज्यातील विद्यापीठांत लोकशाही महोत्सव - उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

थेट भेटा, काम करतो
कोणतेही काम करताना मला मध्यस्थाची गरज पडत नाही. मध्यस्थ आला, तर काम होत नाही. त्यामुळे कधीही शिक्षणविषयक काम असेल, तर मला थेट भेटा. योग्य असेल, तर तुमचे काम होईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

पुणे - ‘जगात आपली लोकशाही सर्वश्रेष्ठ आहे. विद्यार्थ्यांनी संविधान आणि लोकशाहीचा अभ्यास केला पाहिजे. यासाठी पुढील वर्षापासून राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये लोकशाही महोत्सव सुरू केला जाणार आहे. राज्यपालांकडून या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळेल,’’ अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा. सुरेश तोडकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव या वेळी उपस्थित होते.

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दाम्पत्यचा मृत्यू; वाहतूककोंडीही मृत्यूस जबाबदार

सामंत म्हणाले, ‘‘विद्यापीठातून संविधानाचे धडे घेऊन चांगले नेते निर्माण झाले पाहिजेत. लोकशाही म्हणजे काय, हे समजून सांगणारा हा महोत्सव असेल. हा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल. राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते असावे. वर्षभर राजकारण केल्यास राज्य पुढे जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या चष्म्यातून पाहू नये. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुरेशा सोयीसुविधा मिळत नाहीत.

त्यामुळे पुणे-मुंबई येथील मोठ्या संस्थांनी ग्रामीण भागात पोचले पाहिजे.’’ डॉ. एकबोटे, डॉ. करमळकर यांनी मनोगत व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Democracy Festival at Universities in the State uday samant