Currency Ban : नोटाबंदीतील १०१ कोटींची किंमत शून्य; रक्कम बँकाच्या दप्तरी

राज्यातील आठ जिल्हा बँका नऊ वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत; नफ्यात घट.
2000 Note
2000 Notesakal
Updated on

सांगली - राज्यातील आठ जिल्हा बॅंकांकडे नोटीबंदी काळापासून पडून असलेल्या १०१.१८ कोटींची रक्कम बँकाच्या दप्तरी जपून ठेवली असली तरी केवळ कागदी तुकड्यांचा ढीग एवढेच त्याचे महत्त्‍व उरले आहे.

बँकेच्या हिशेबी केवळ शिल्लक रक्कम असे, या रकमांचे स्वरूप गेल्या आठ वर्षांपासून आहे. लेखाधिकारी व ‘नाबार्ड’ने २०२३-२४ च्या नफा वाटणीत या रकमांची तरतूद करण्याची सूचना केल्याने आता हा पैसा ‘खोटा’ असे म्हणायची वेळ आता बँकांवर आली आहे.

याबाबतचे दावे सध्या सर्वोच्च न्यायालय व केंद्रीय अर्थ सचिवांपुढे प्रलंबित असल्याने या नोटा जपाव्या लागत आहेत. काळा पैसा चलनातून कायमचा हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी त्यांनी स्मितहास्य करीत त्या नोटा केवळ कागदाचा तुकडा असल्याचे जाहीर केले होते. त्यांचे हे शब्द या जिल्हा बँकांबाबत शब्दशः खरे ठरले आहेत. गेली आठ वर्षे या नोटा पडून होत्या. त्या नोटाएवढी तरतूदच नफ्यातून करायला लावली गेल्याने खरोखरच या नोटा आता ‘कागज का तुकडा’ ठरल्या आहेत.

नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने नागरिकांसह सर्वांना त्यांच्याकडील नोटा सर्व सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांत जमा करण्याची मुदत दिली होती. या धांदलीत राज्यातील जिल्हा बँकांना मात्र अल्प कालावधीसाठी मुदत दिली. त्याकाळात राज्यातील जिल्हा बँकांतून सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देण्यात आल्या. त्याचवेळी केंद्र सरकारने यातील काही रकमांबाबत वेळेचे कारण देत संशय व्यक्त केला.

त्यात प्राप्तीकर विभागाने जिल्हा बॅंकांची तपासणीही केली. बँकांचे व्यवहार तपासण्यात आले. नोटा बदलून घेतलेल्या खातेदारांचीही चौकशी झाली. शेवटी आठ जिल्हा बँकांना लगाम घालत रिझर्व्ह बॅंकेने ‘ही’ रक्कम जमा केली नसल्याचे कारण देत नोटा स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हापासून आजतागायत राज्यात असे १०१.१८ कोटी रुपये जिल्हा बँकांकडे अडकले आहेत.

व्याजाचा भुर्दंड

सांगली जिल्हा बॅंकेकडे १४.७२ कोटी रुपयांच्या नोटा शिल्लक आहेत. या शिल्लक नोटांना ‘एसबीएन’ (स्पेसिफाइड बँक नोट्स) असे म्हणतात. नोटाबंदीनंतर पाचशे आणि हजारांच्या नोटांचा उल्लेख असा केला जातो. थोडक्यात नोटा आहेत मात्र त्यांची किंमत शून्य आहे.

या नोटा शून्य किमतीच्या असल्या तरी जपून ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. गेल्या वर्षापर्यंत या नोटा बँकांकडे पडून असल्याने त्याचा व्याजाचा भुर्दंड बँकांना बसला. आता नफ्यातून त्याची तरतूद केल्याने या नोटा थोडक्यात शून्य किमतीच्या ‘नॉन परफॉर्मिंग ॲसेट’ ठरल्या आहेत. त्यांची जपणूक करण्याचा खर्च बँकांना करावा लागत आहे.

नोटाबंदीतील राज्यातील जिल्हा बँकांची अडकलेली ही रक्कम कदाचित देशात सर्वाधिक असावी. आजही या नोटा बदलून द्याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे केंद्रीय अर्थ सचिवांकडे अपील दाखल केले आहे. निकाल आमच्या बाजूने लागला तरच आशा आहे.

- शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com