esakal | ...हे देशाच्या जनतेचं दुर्दैव; अजित पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

हे देशातील जनतेचं दुर्दैव; अजित पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

हे देशातील जनतेचं दुर्दैव; अजित पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजधानी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दहा महिने झाले. पण चर्चा होताना दिसत नाही. आता तर लोकसभेचं अधिवेशनही संपलं, आता पुढच्या वर्षी अधिवेशनातच हा मुद्दा उपस्थित करता येईल. सध्या केंद्र सरकारची असलेली भूमिका ही देशाच्या जनतेचं दुर्दैव आहे, अशी टीका अजित पवार यांनी केंद्र सरकारवर केली. कोरोना उपाययोजना संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

गॅस आणि पेट्रोलच्या दरवाढी संदर्भात पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. 'अच्छे दिन आनेवाले है' म्हणून लोकांनी केंद्रात भाजप सरकारला निवडून दिले. कोरोनामुळे जनता त्रासली आहे. त्यात केंद्र सरकारने लक्ष देऊन इंधनाचे दर नियंत्रणात ठेवावेत. देशात प्रचंड महागाई वाढली आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाले, अनेकांचे उद्योग अडचणीत आले आहेत. त्यासाठी लोकांनी आंदोलनं केली. पण केंद्र सरकार दखल घेताना दिसत नाही, असे पवार म्हणाले.

हेही वाचा: गणेशोत्सवामध्ये पुण्यात नवे निर्बंध नाहीत, पण... - अजित पवार

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार आहेत. त्यामुळे कोरोना उपाययोजनांबाबत सध्याचेच निर्बंध राहतील. गणेशोत्सवाचा पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन गर्दी झाल्यास कठोर निर्बंध लावण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पवार म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण दर 4 टक्के आहे. स्विमिंग टँक सुरू करण्याला परवानगी देण्यात आली नाही. कोरोना आटोक्यात आल्यानंतर नियम पाळून निर्णय घेण्यात येईल. रुग्ण वाढल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील. शाळा- महाविद्यालयांमध्ये लसीकरण करायचे आहे, त्याला प्रतिसाद मिळत आहे. शाळा सुरू करताना शिक्षक, मुख्याध्यापकांचे लसीकरण आधी करण्यात येणार आहे.

हेही वाचा: गणेशोत्सवामध्ये पुण्यात नवे निर्बंध नाहीत, पण... - अजित पवार

ग्रामीण भागात रुग्णसंख्या जास्त आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यात रुग्ण जास्त असून चाचण्या वाढवल्यामुळेही रुग्ण वाढले आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात नियोजन करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांच्या कार्यक्षेत्रात ऑक्सिजन बेड्स आणि हॉस्पिटल तयार केले आहेत. काही हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठी वेगळी व्यवस्था केली आहे. जम्बो कोविड सेंटरची यंत्रणा सुरूच आहे.

loading image
go to top