esakal | गणेशोत्सवामध्ये पुण्यात नवे निर्बंध नाहीत, पण... - अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवामध्ये पुण्यात नवे निर्बंध नाहीत, पण... - अजित पवार

गणेशोत्सवामध्ये पुण्यात नवे निर्बंध नाहीत, पण... - अजित पवार

sakal_logo
By
नामदेव कुंभार

गणेशोत्सवामध्ये गर्दी होतेय असं जाणवल्यास पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी निर्बंधाचा निर्णय घेऊ.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास निश्चितपणे कठोर भूमिका घ्यावी लागेल. मात्र गणेशोत्सवामध्ये पुण्यात कोरोनाचे नवीन निर्बंध लादणार नसल्याची माहिती पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. कोरोनाचे नियम पाळा, गणेशोत्सवामध्ये कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका, असे आवाहन अजित पवार यांनी पुणेकरांना केलं आहे. यावेळी ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

शहरातील गणपती मंडळाने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा. त्यामुळे नागरिकांना ते पाहण्यासाठी येता येईल, मात्र खूप गर्दी होतेय असं जाणवल्यास पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी निर्बंधाचा निर्णय घेऊ. कृपया, तशी वेळ येऊ देऊ नका. सध्या पुण्यात नव्याने निर्बंध लादण्याचा कोणताही विचार नाही, असे अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा: गणेशोत्सव, ईद, दिवाळीसाठी केंद्राची मार्गदर्शक सूचना

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना आधिक धोका असवल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यानुसार तयारी केली जात आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊनच शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा: ...अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध, अजित पवारांचा थेट इशारा

जवळपास दहा मिहिन्यापासून राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. मात्र, मोदी सरकारकडून याची कोणतीही दखल घेतली जात नाही. हे जनतेचं दुर्दैव आहे. अशी टीका करतानाच इंधन दरवाढीवरुन अजित पवार यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले. कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. ते नियंत्रित करण्यासाठी केंद्राकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही, असी टीका अजित पवार यांनी केली.

loading image
go to top