esakal | कोरोना आढाव्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची फटकेबाजी ; चंद्रकांत पाटील, नाना पटोलेंच्या वक्‍तव्याचा समाचार
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना आढाव्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची फटकेबाजी

कोरोना आढाव्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची फटकेबाजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर : जिल्‍ह्यातील कोरोना (covid 19)स्‍थितीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar)यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrkant patil, nana patole)व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्‍तव्याचा समाचार घेतला. चंद्रकांतदादांनी जीएसटीबाबत केलेले विधान हे त्यांच्या अज्ञानातून असल्याचे सांगत त्यांच्या वक्‍तव्यावर पवार यांनी टोलेबाजी केली. आगामी निवडणुका स्‍वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या पटोले यांच्याही वक्‍तव्याचा समाचार घेत असताना, निवडणुकीचा निर्णय हा केंद्रीय स्‍तरावरून होत असल्याचे सांगत पटोले यांच्या वक्‍तव्याला महत्‍व नसल्याचेही पवार यांनी सूचित केले. deputy-chief-minister-ajit-pawar-criticism-on-chandrakant-patil-nana-patole-political-marathi-news

इतर जिल्‍ह्यांच्या तुलनेत जिल्‍ह्यातील कोरोना रुग्‍णांची संख्या वाढत आहे. त्याची कारणमीमांसा व उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्‍हापूरला भेट देत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्‍थितीत आढावा बैठक घेतली. कोरोनाचा आढावा झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री पवार यांनी विविध विषयांवर सरकारची भूमिका स्‍पष्‍ट केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्र शासनाने जीएसटीची रक्‍कम दिली असताना, राज्य शासनाकडून ओरड सुरू असल्याचे वक्‍तव्य केल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर आम्‍ही अधिकृतरित्या मंत्रिमंडळात आहोत.

मुख्यमंत्री उद्ध‍दव ठाकरे यांच्यासोबत आम्‍ही निर्णय प्रक्रियेत आहे. मंत्रिमंडळाने पाठपुरावा केल्याने कोरोना वैद्यकीय साहित्यामध्ये सवलत मिळाली आहे. याबाबतची खरी माहिती आमच्याकडे आहे. मात्र चंद्रकांतदादांना काही माहिती नाही. अज्ञानातून त्यांनी याबाबतचे वक्‍तव्य केले आहे. त्यांना वास्‍तव माहिती नसल्याने ते काहीही बोलत राहतात. त्यांची अवस्‍था विनाश काले विपरित बुद्धी झाल्याचा टोला उपमुख्यमंत्री पवार यांनी लगावला.

हेही वाचा- Be Alert :तुम्हाला लिंक-पोस्ट, कॉल येतोय

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी विधानसभेसाठी स्‍वबळाचा नारा दिल्याच्या वक्‍तव्याचा समाचारही पवार यांनी घेतला. ते म्‍हणाले, ‘‘राज्यातील निवडणुकीत काय भूमिका घ्यायची याचा निर्णय काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना प्रमुख उद्ध‍दव ठाकरे यांना आहे. त्‍यामुळे कोणी, काही विधान करत असेल तर त्याला फार महत्‍व नसल्याचे सांगत श्री. पटोले यांच्या वक्‍तव्यास बेदखल केले.

loading image