Devendra Fadanvis: कायदा व सुव्यवस्था राखण्यात महाराष्ट्राची स्थिती चांगली; देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadanvis: पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विरोधकांनी विधानसभेत कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला होता.
devendra fadanvis
devendra fadanvisesakal

Devendra Fadanvis:

मुंबई- पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विरोधकांनी विधानसभेत कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. कायदा व सुव्यवस्थेचा विचार आकड्यांच्या आधारावर केला जातो. त्यानुसार महाराष्ट्रातील गुन्हेगारीचं प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी झालंय. राज्यात राहत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित वाटणं महत्वाचं असतं. मुंबई महिलांसाठी सुरक्षित शहर आहे. मुंबईत महिला रात्री एकट्याने प्रवास करु शकतात, असं फडणवीस म्हणाले.

देशात महाराष्ट्र दोन क्रमांकाच्या लोकसंख्येचे राज्य आहे. एक लाख लोकसंख्येमागे गुन्हे किती घडतात हे पाहिलं जातं. यानुसार महाराष्ट्रात 294.3 गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचा दहावा क्रमांक आहे. 2023 च्या अखेरपर्यंत जे गुन्हे दाखल झालेत, मागील वर्षीच्या गुन्हांच्या तुलनेत त्यांची संख्या कमी आहे. जेव्हा एखादी महिला गायब होते तेव्हा 72 तासांच्या आत एफआयआर दाखल करुन घ्यावा लागतो. तसेच अपहरण म्हणून या प्रकरणाचा शोध सुरु करावा लागतो. महिला व बालकांच्या अत्याचारामध्ये महाराष्ट्राचा बारावा क्रमांक लागतो. बाललैंगिक गुन्ह्याचा विचार केल्यास महाराष्ट्राचा 17 वा क्रमांक लागतो, अशी माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली.

महिला जेव्हा गायब होतात तेव्हा त्यामागे वेगवेगळे कारणं असू शकतात. काही वयस्कर महिला घर सोडून जात असतात. 2021 मध्ये गायब झालेल्या महिलांपैकी 87 टक्के महिला परत आल्या आहे. 2022 मधील प्रकरणापैकी 80 टक्के महिला परत आल्या आहेत. 2023 मध्ये जुलै महिन्यातील आकडेवारीनुसार 63 टक्के महिला घरी परत आल्या आहेत. हा आकडा नक्कीच 90 टक्क्यांवर जाईल. 90 टक्के हा आकडा भूषावहं नाही, पण देशातील इतर राज्यांची तुलना करता आपली कामगिरी चांगली आहे. देशाच्या तुलनेत आपली सरासरी 10 टक्क्यांनी जास्त आहे, असं ते म्हणाले.

बालकांच्या बाबतीत मुस्कान ऑपरेशनच्या माध्यमातून पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे. 2021 मध्ये गायब झालेल्या बालकांपैकी 96 टक्के बालके परत आणलेली आहेत. 2022 मध्ये 91 टक्के कर 2023 मध्ये 71 टक्के बालकांना परत घरी आणण्यात आलं आहे. 100 टक्के बालकांना परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून पोलिसांनी चांगलं काम केलं आहे, केंद्रानेही याचा उल्लेख केला असल्याचं फडणवीस म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com