Devendra Fadanvis News : 'आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला नाही', फडणवीसांनी सभागृहात दिली घटनेबाबत महत्त्वाची माहिती

Alandi Lathi Charge: आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी व पोलिसांमध्ये मंदिरप्रवेशावरून वाद उपस्थित झाला होता
Devendra Fadanvis on Alandi lathi charge on  Warkari
Devendra Fadanvis on Alandi lathi charge on WarkariEsakal

Maharashtra Monsoon Session Update : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. एक दिवस आधी विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता अखेरच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये उत्तर दिले यावेळी त्यांनी आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी व पोलिसांमध्ये मंदिरप्रवेशावरून वाद उपस्थित झाला होता. वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या प्रकरणावर उत्तर दिलं आहे.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'वारकऱ्यांवर लाठीचार्ज केलेला नाही. मागच्या वर्षी मंदिरात प्रवेश दिला त्यावेळी महिलांच्या अंगावर महिला पडल्या त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नियोजनावर बैठक झाली. यामध्ये वरिष्ठ पोलीस आधिकारी, आळंदी शहरातील काही प्रतिष्ठीत मंडळी, ५६ दिड्यांचे प्रमुख आणि मंदिराचे विश्वस्थ यांच्यामध्ये बैठक झाली.'

Devendra Fadanvis on Alandi lathi charge on  Warkari
Maharashtra Crime : "दरदिवशी ७० मुली गायब होतायत, हे खरं नाहीये"; महिलांच्या सुरक्षेबाबत फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

'या बैठकीमध्ये ५६ दिंड्याना प्रत्येकी ७५ पास द्यायचे. पहिलं त्यांना प्रवेश द्यायचा. ते दर्शन घेऊन मंदिराबाहेर निघाल्यानंतर इतरांना दर्शनासाठी आत सोडायचं हे ठरलं होतं. त्याचवेळी दर्शन सुरू असताना सुरक्षेसाठी तिथे काही बॅरिकेट लावले होते.'

'बॅरिकेट लावलेल्या ठिकाणी जोग महाराज शिक्षण प्रशालेचे काही आजी माजी विद्यार्थी आले. त्यांनी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला. त्यांना समजवण्यात आलं, आत गेलेल्यांच दर्शन होऊ द्या. मग तुम्ही जा असं सांगण्यात आलं.

पंरतु त्यांनी न ऐकता बॅरिकेट तोडलं व पोलिसांना तुडवून ते पुढे गेले. पण पुन्हा पोलिसांनी त्यांना थांबवलं. त्यांना पुन्हा बॅरिकेट पर्यंत आणलं. त्याचे काही व्हिडीओ सोशल मिडीयावर वेगळ्या प्रकारे शेअर करण्यात आले.'

'मंदिर परिसरातील ही सर्व सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. संपुर्ण घटना तपासली असता त्यामध्ये कुणालाही लाठीचार्ज झाला नसल्याचे दिसुन येत आहे'. घटनेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज असल्याचंही पुढे फडणवीस म्हणाले आहेत.

Devendra Fadanvis on Alandi lathi charge on  Warkari
Devendra Fadanvis: कायदा व सुव्यवस्था राखण्यात महाराष्ट्राची स्थिती चांगली; देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com