"जिलेबी कितीही.."अमृता फडणवीस यांनी देवेंद्रजींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस.
deputy chief minister Devendra Fadnavis Birthday
deputy chief minister Devendra Fadnavis Birthday esakal
Updated on

राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. या निमित्ताने त्यांच्यावर भारतातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिलेल्या शुभेच्छा सध्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी जिलेबीचं उदाहरण देत देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले आहे. (deputy chief minister Devendra Fadnavis Birthday Amruta Fadnavis maharashtra politics)

अमृता फडणवीस यांचे ट्विट सध्या चर्चेत आले आहे. अमृता यांनी फडणवीसांना जिलेबी भरवत असलेला फोटो ट्विट केला केला आहे. आणि वाढदिनाच्या शुभेच्छा त्यांनी त्यांच्या खास शैलित दिल्या आहेत. त्यांचे हे ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

deputy chief minister Devendra Fadnavis Birthday
नागपूर ते बारामती: महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा बड्डे एकाच दिवशी, कशी आहे दोघांची स्टाईल ?

काय म्हटले आहे ट्विटमध्ये?

जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

आशा आशयाचे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

अशी बांधली गेली अमृता यांनी देवेंद्रसोबत लग्नगाठ

नुकतंच महाराष्ट्रात सत्तांतर झालं. या सत्तांतराने एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त झाले. विशेष म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासात अमृता यांनी त्यांना तितकीच मोलाची साथ दिली आहे. खरं तर कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नागपूरमधील डॉक्टर चारू आणि शरद रानडे यांची मुलगी अमृता.

एका मुलाखती दरम्यान अमृता फडणवीसांनी त्यांच्या लग्नबद्दलचा किस्सा शेअर केला होता. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या देवेंद्रजीनी अविवाहित राहून संघाचे कार्य करायचे ठरवले होते. देव देश आणि धर्म यासाठी आयुष्य वेचायचे ठरवले होते. पण त्यांच्या आईला हा निर्णय मान्य नव्हता.

त्यांनी देवेंद्रना हा निर्णय बदलायला सांगितले. मग मात्र वयाच्या एका टप्प्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि वधू संशोधन सुरु झालं आणि योगायोग म्हणजे अमृता आणि देवेंद्र त्यांचे मित्र शैलेश जोगळेकर यांच्या घरी पहिल्यांदा भेटले.

एक तासभर बोलल्यानंतर त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री होती काजोल. त्यांना अमृतामध्ये तिचा भास झाला. त्यांनी तसं सांगितलं पण. मग त्यां दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला.

२००५ साली डिसेंबर मध्ये त्यांनी नागपूरच्या बोटॅनिकल गार्डन मध्ये लग्न केले. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाला नागपूरमधील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या ५०० लोकांना आमंत्रण दिले होते. लग्नानंतर कितीतरी दिवस अमृता देवेंद्रना सर अशी हाक मारत. मग काही दिवसांनी देवेन म्हणू लागल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com