शिंदे-फडणवीस-नार्वेकरांची महत्त्वपूर्ण बैठक! उद्धव ठाकरेंना आमंत्रण देण्याबाबत घेतला मोठा निर्णय

काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
Shinde-Fadanvis
Shinde-FadanvisEsakal

काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते. या तिघांच्या भेटी मागचं कारण अस्पष्ट असून दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली.

यानंतर राहुल नार्वेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले की, येत्या 23 जानेवारी रोजी विधान भवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण होणार आहे. या सोहळ्यासंदर्भात शिंदे-फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. या कार्यक्रमाच आमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं आहे.

Shinde-Fadanvis
Congress : महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेस अ‍ॅक्शन मोडमध्ये; महिला शहराध्यक्षही बदलणार

त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंबाला आमंत्रण देण्यात आलं आहे. राहुल नार्वेकर म्हणाले मी स्वत: त्यांच्याशी बोललो आहे. बाकी आमदार, खासदार, कला क्षेत्रातील सर्वाना आम्ही आमंत्रित केलं आहे असं नार्वेकर म्हणाले आहेत.

यावेळी या नेत्यांमध्ये पाऊणतास चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय घडलं? नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली? हे सर्व गुलदस्त्यात आहे. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. फडणवीस यांना रात्री उशिरा शिंदे यांची भेट घेण्याची गरज का पडली? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

Shinde-Fadanvis
Kasba Peth Bypoll Election : कसबा बिनविरोध नाहीच! पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस अ‍ॅक्शन मोडमध्ये

बाळासाहेब ठाकरे यांचं नाव राज्याच्या राजकारणासह देशभर घेतलं जात. राजकारणात अनेक महत्वाच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग होता. पण त्यांनी कधीही राज्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला नाही. मात्र राजकारणातल्या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्याचं हे तैलचित्र विधीमंडळात लावण्यात येणार आहे.

Shinde-Fadanvis
Britain Police : पोलिसांची थेट देशाच्या पंतप्रधानांवरच मोठी कारवाई; कारण जाणून तुम्हीही सावध व्हाल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com