Maharashtra Politics: सागर बंगल्यावर बैठक अन् आज मुख्यमंत्री पुन्हा दिल्ली वारीवर; राजकीय घडामोडींना वेग

देवेंद्र फडणवीस आणि मुंबईतील आमदार, खासदार आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सागर बंगल्यावर बैठक
allocation of seats Lok Sabha poll 22 cm eknath shinde devendra fadanvis politics mumbai
allocation of seats Lok Sabha poll 22 cm eknath shinde devendra fadanvis politics mumbai esakal

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतानाच इकडे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यात खलबत सुरू आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. ही बैठक तब्बल दोन तास चालली, त्यामुळे सागर बंगल्यावर नेमकी काय खलबतं झाली आहेत याकडे राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे. (Latest Marathi News)

गेल्या काही दिवसात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांमध्ये बैठकीचं सत्र सुरू आहे. या बैठकीचे राजकीय वर्तुळातून अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत. कारण दोनच दिवसापूर्वी भाजपचे आमदार आशिष शेलार वर्षा बंगल्यावर हातात काही कागद घेऊन हजर झाले. त्यानंतर काल देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.(Latest Marathi News)

allocation of seats Lok Sabha poll 22 cm eknath shinde devendra fadanvis politics mumbai
BLOG: मोदी-शहांनाही भीती वाटावी! ब्रिजभूषण सिहांकडं नेमकी कोणती कवचकुंडलं?

फडणवीस यांच्या उपस्थितीत सागर बंगल्यावर बैठक झाल्यामुळे आणि मुंबईतील आमदार-खासदार यांची उपस्थिती असल्याने या बैठकीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सागर बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती ठरवली गेल्याची चर्चाही केली जात आहे. या बैठकीला प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, भारती लव्हेकर, आणि आशिष शेलार हे या बैठकीला उपस्थित असल्याने आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची शक्यता असल्याचे बोललं जात आहे.(Latest Marathi News)

allocation of seats Lok Sabha poll 22 cm eknath shinde devendra fadanvis politics mumbai
NMC Promotion Black Market: महापालिकेत पदोन्नत्यांचा काळाबाजार; पात्र नसतानाही अभियंता पदावर पदोन्नती

तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. एकनाथ शिंदे अमित शाह यांचीही भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात असू यावेळी मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.(Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com