esakal | पुण्यात निर्बंध वाढवण्याची वेळ येईल; अजित पवार यांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

पुण्यात निर्बंध वाढवण्याची वेळ येईल; अजित पवार यांचा इशारा

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

पुणे : महाराष्ट्रात कोरोना (coronavirus) कमी व्हायला लागला. पण, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात रुग्ण आहेत. शनिवारी, रविवारी प्रचंड गर्दी होत असते. महाबळेश्वर, खंडाळा-लोणावळा येथे पर्यटकांची गर्दी होत असते. देवदर्शनाच्या निमित्ताने बाहेर जातात. ते ठीक आहे. पण, ट्रेकिंगला आणि पर्यटनालाही लोक जातात. तसं जर झालं तर पुण्यातील बाहेर गेलेले लोकांना १५ दिवस क्वारंटाइन करावे लागेल. तसे आदेश काढावे लागतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. (deputy cm ajit pawar about pune restrictions)

हेही वाचा: नाना पटोले यांचा दिग्रसमध्ये किल्लेदार कोण?

कोरोनाचे संकट आता हळूहळू कमी होत आहे. पण तरी देखील सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी एकत्र बसून आम्ही निर्णय घेतला की, शनिवारी व रविवार देखील बंद राहणार. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. सोमवार ते शुक्रवार चालू राहील. पुढच्या शनिवार-रविवारी देखील ही परिस्थिती राहील. टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी सांगितलं, अमेरिका, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रीका याठिकाणी तिसरी लाट येऊ पाहत आहे. त्याठिकाणी लसीकरण होऊनही तशी परिस्थिती झाली आहे. मात्र, प्रत्येक माणसाचं आरोग्य नीट असेल तर ठीक आहे. नाहीतर कर्त्या व्यक्तीला जीव गमावला तर कुटुंब उघड्यावर पडतं. तसं होता कामा नये, असे अजित पवार म्हणाले.

पिंपरी-चिंचवडमधील मृत्यूचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चार नावाजलेल्या रुग्णालयातील डेटा गोळा केला. याठिकाणी ५३ टक्के मृत्यू हे ६० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत. २५ ते ६० वयोगटातील नागरिकांचे हे मृत्यू आहेत. बरेचशे तरुण-तरुणी आहेत. ४३ टक्के मृत्यू हे कोणत्याही प्रकारची व्याधी नसलेल्या लोकांचे झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

loading image
go to top