esakal | नाना पटोले यांचा दिग्रसमध्ये किल्लेदार कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

नाना पटोले यांचा दिग्रसमध्ये किल्लेदार कोण?

नाना पटोले यांचा दिग्रसमध्ये किल्लेदार कोण?

sakal_logo
By
ऋषिकेश हिरास

दिग्रस (जि. यवतमाळ) : विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पंचवीस वर्षांपासून ढासळलेला किल्ला आपणास पुनश्च ताब्यात घ्यायचा आहे, असे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Pradesh Congress Committee President Nana Patole) यांनी पोहरादेवी येथे जाताना दिग्रस येथील विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शना दरम्यान केले. परंतु, गेलेला किल्ला परत मिळवायचा असेल तर प्रचंड राजकीय शक्ती असलेला किल्लेदार शोधणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे ‘नाना पटोले यांचा दिग्रसमध्ये किल्लेदार कोण’ (Who was the fort keeper of Nana Patole in Digras?), असा प्रश्न दिग्रसकरांना पडला आहे. माजी राज्यमंत्री संजय देशमुख (Former Minister of State Sanjay Deshmukh) शनिवारी (ता. १९) काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार का? अशी चर्चा दिग्रस विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन दिवसांपासून जोमाने सुरू आहे. (Will-former-Minister-of-State-Sanjay-Deshmukh-join-the-Congress?)

काँग्रेसचा अभेद्य गड म्हणून दिग्रस विधानसभा मतदार संघाला ओळखले जायचे. जर का आमदार व्हायचे असेल तर काँग्रेस पक्षाचे तिकीट घेऊन दिग्रस मतदारसंघांमध्ये निवडणूक लढा व आमदार बना हे समीकरण ठरलेले होते. परंतु, काँग्रेसच्या या गडाला पहिल्यांदा सुरुंग लावले ते शिवसेनेचे बाळासाहेब मुनगिनवार यांनी. १९९४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकावर ठेवून बाळासाहेब मुनगिनवार विजय झाले. त्यानंतर मात्र १९९९ व २००४ असे सलग दोनदा माजी राज्यमंत्री संजय देशमुख दिग्रस येथून निवडून आले.

हेही वाचा: सोमवारपासून नवीन नियम : हे होणार बदल; दुकानांची वेळही बदलली

निवडून आल्यानंतर आगळ्यावेगळ्या कार्यशैलीने संजय देशमुख यांनी पाळेमुळे घट्ट केली. परंतु, २००९ साली दिग्रस मतदार संघामध्ये दारव्हा व नेर या गावांचा समावेश झाला आणि याच दरम्यान २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे संजय राठोड यांनी संजय देशमुख यांची खोलवर रुजलेली राजकीय पाळेमुळे सैल केलीत व सलग तीन वेळा निवडून येण्याचा बहुमान पटकावला.

दिग्रस विधानसभेची ही राजकीय पार्श्वभूमी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यवतमाळ येथे मुक्कामी असताना जाणून घेतली व दिग्रसच्या भूमित प्रवेश करतात दिग्रसला हा गड परत मिळवायचा असा मनसुबा जाहीर केला. धुरंदर राजकीय नेते म्हणून नाना पटोले यांचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केला जातो.

हेही वाचा: काँग्रेसचे मजबुतीकरण की भाजप, राष्ट्रवादीला शह?

नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड होताच आपणास हायकमांडने पक्ष वाढीची जबाबदारी दिली आहे, ही बाब हेरून जर पक्ष वाढवायचा असेल तर जुने काँग्रेसचे नेते जे पक्ष सोडून गेले त्यांना परत पक्षामधे आणण्यासाठी त्यांच्याशी थेट बोलणी सुरू केली आणि महाराष्ट्रातील पुढील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल असे जाहीर केले. त्यामुळे अनेक काँग्रेस पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले खरे पण सत्तेत नाहीत अशा नेत्यांची पाऊलं काँग्रेसच्या दरवाजाकडे वळू लागली आहेत.

शनिवारी मुंबई येथे अमरावती येथील डॉ. सुनील देशमुख यांच्यासह विदर्भातील अनेक बलाढ्य राजकीय शक्ती असणारे नेते काँग्रेसमध्ये परतणार आहेत. दोन दिवसांपासून दिग्रसचा माजी बलाढ्य नेता काँग्रेसमध्ये परतणार अशा चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नाना पटोले यांना ७५ ते ८० हजार मतदान घेणाऱ्या बलाढ्य नेत्याविषयी कळाल्याने त्यांच्यात काही चर्चेच्या फेऱ्या सुद्धा झाल्याचे दोन्ही बाजूचे समर्थक खुलेआम दिग्रस मध्ये सांगत सुटले आहेत. इतकेच नव्हे तर, कोणी समोर येऊन बेधडकपणे ‘तो मी नव्हेच’ असे सुद्धा स्पष्ट करीत नाही. त्यामुळे दिग्रस विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘भाऊंचा प्रवेश कधी?’ अशी एकच चर्चा जोर धरत आहे.

हेही वाचा: तारांना स्पर्श झाल्याने मृत्यू; महावितरण म्हणे, वीज प्रवाहच नाही

मुहूर्त टाळला?

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजपची युती होणार नाही ही बाब गृहीत धरून अनेकांनी आपापल्या सोयीनुसार पक्ष प्रवेश केला खरा परंतु ऐन वेळेवर शिवसेना व भाजपची युती झाली आणि अनेक नेते तोंडघशी पडले. आता मात्र काँग्रेसने सुद्धा ‘एकला चलो रे’चा नारा दिला खरा परंतु ऐन मोक्यावर कुणाशी युती झाली तर काय? हा प्रश्न अनेकांना पडला तर नसेल ना? आणि म्हणूनच अनेकांनी मुहूर्त तर टाळला नाही ना? अशी शक्यता नाकारता येत नाही.

(Will-former-Minister-of-State-Sanjay-Deshmukh-join-the-Congress?)

loading image
go to top