Maharashtra Politics | ...अन् फडणवीसांनी माध्यमांसमोरच एकनाथ शिंदेंना करून दिली पक्षश्रेष्ठींची आठवण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Devendra Fadnavis
...अन् फडणवीसांनी माध्यमांसमोरच एकनाथ शिंदेंना करुन दिली पक्षश्रेष्ठींची आठवण!

...अन् फडणवीसांनी माध्यमांसमोरच एकनाथ शिंदेंना करून दिली पक्षश्रेष्ठींची आठवण!

राज्यातल्या नाट्यमय घडामोडी आता अंताकडे आल्याची चिन्हं दिसू लागलीयेत. राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार पडलं. त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांचा हात धरत मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवली. या सगळ्या दरम्यान आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (CM Eknath Shinde News)

हेही वाचा: Maharashtra Politics LIVE: महाराष्ट्रात आता 'शिंदे सरकार'!!!

शपथविधीपूर्वीच्या पत्रकार परिषदेतला हा व्हिडीओ आहे. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री होणार ही घोषणा करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे आभार मानत होते. तेवढ्यात देवेंद्र फडणवीसांनी (Deputy CM Devendra Fadnavis) त्यांना खुणावलं आणि त्यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (BJP President JP Nadda) यांचं नावही घेण्यास सांगितलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत.

हेही वाचा: बाळासाहेब, आनंद दिघेंचं स्मरण करुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान

राज्यात गेल्या ९ ते १० दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत होत्या. शिवसेनेच्या आमदारांचं एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखालील बंड, त्यानंतर त्यांचं सूरत, गुवाहाटी, गोवा प्रवास, देवेंद्र फडणवीसांच्या वाढलेल्या दिल्ली वाऱ्या या सगळ्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणं या सगळ्यानंतर आता अखेर राज्यात एकनाथ शिंदे सरकार स्थापन झालं आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. अद्याप शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यातच आहेत. त्यामुळे राज्यात आणखी सत्ता नाट्य घडणार का? याकडे आता लक्ष लागून आहे.

Web Title: Deputy Cm Devendra Fadnavis Cm Eknath Shinde Bjp Jp Nadda Oath Taking Ceremony

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..