
Devendra Fadanvis : अशोक चव्हाण पुढचं सरप्राईज आहे का?; फडणवीसांनी दिलं उत्तर
Devendra Fadanvis On Ashok Chavhan : गेल्या अडीच वर्षांपासून राज्याला सर्वाधिक सरप्राइज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आता हे सरप्राइजेस संपले आहेत का? या प्रश्नाचं उत्तर खुद्द फडणवीसांनी दिले आहे.
हेही वाचा : ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी
हेही वाचा: Devendra Fadnavis : "सत्तांतरात उद्धव ठाकरेंचा मोठा वाटा, त्यांचे आभार मानतो" ; फडणवीस असं का म्हणाले?
२०२४ पर्यंतचे सर्व सरप्राईजेस संपले आहे, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत का? याचे देखील उत्तर दिले आहे. ते एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजवन कार्यक्रमात बोलत होते.
सत्तेत येण्यापूर्वी भाजपचा प्लान A म्हणजे अजित पवार, प्लान B एकनाथ शिंदे होता. त्यानंतर आता प्लान C अशोक चव्हाण आहे का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला.
हेही वाचा: Mumbai: झवेरी बाजारात बोगस ईडी अधिकाऱ्यांची छापेमारी; कोट्यवधींची लूट
त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री आणि आपण स्वतः २०२४ मध्ये अनेक सरप्राइजेस देऊ असे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून, नेमकं शिंदे-फडणवीस अजून काय सरप्राईज देणार हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा: Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकर अॅक्टिव्ह मोडमध्ये; भारत जोडो यात्रेत सहभागी
सध्या तरी प्लान A, B, C D असे काही नसून, सध्या तरी प्लान गव्हरन्स आहे. सध्याच्या सरकारला गव्हरन्सवर फोकस करायचा असून, गेल्या अडीच वर्षापासून राज्य जे स्टँड स्टील झालं होतं, राज्याचा विकास जवळजळ थांबली होती. त्यामुळे राज्याला पुन्हा ग्रोथ पाथवर आणायचं लक्ष आहे. त्यासाठीच सध्या काम केले जात असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.