अडीच वर्षाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

Devendra Fadanvis clarify about Power Sharing formula with Shivsena
Devendra Fadanvis clarify about Power Sharing formula with Shivsena

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा वाढल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांनी अडीच वर्षाचा निर्णय माझ्यासमोर झालाच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे, वरिष्ठांनीही कधी यावर कोणाला शब्द दिला नव्हता. अडीच वर्षाच्या निर्णयावर एकदा बोलणी फिस्कटलीही होती असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'निकाल लागल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे सरकार बनविण्याचे पर्याय खुले असल्याचे सांगून एक प्रकारे धक्का दिला. आम्ही केलेल्या कामाची पावती आम्हाला जनतेने दिली. पण, दुर्दैवाने अपेक्षापेक्षा कमी जागा आल्या'.

मसुदा नको, मुख्यमंत्री पदावरच बोला- राऊत

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक गोष्टीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षानी ज्याप्रकारे टीका करण्याची हिंमत केली नाही, अशी हिंमत आमच्या मित्रपक्षाने केली असल्याचे फडणवीस म्हणाले. शिवसेनेने मोदींवर केलेली टीका ही विखारी होती. शिवसेनेची भाषा गेल्या काही दिवसांत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. आम्ही कधीही शिवसेनेवर अशा प्रकारची टीका केली नसल्यचेही फडणवीस यांनी सांगितले.

रजनीकांत म्हणतात, हा माझ्या विरोधात भाजपचा डाव; तमीळनाडूत वाद उफाळला

फडणवीस पुढे म्हणाले, 'अशा वक्तव्यांमधून सरकार तयार होत नसतं. दोन्ही पक्षांमध्ये दरी वाढवण्याचं काम त्यांनी केलं. ज्या भाषेत बोललं जातं त्यापेक्षा जबरदस्त भाषेत उत्तर देऊ शकतो. आम्ही जोडणारी लोकं आहोत. तोडणारी नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेत्यांनी कधीच टीका करत नाहीत. विरोधात लढूनही केली नाही आणि करणार नाही. आमचे नेते नरेंद्र मोदींच्या विरोधात खालच्या भाषेत टीका केली. अशा प्रकारची टीका आम्ही करत नाही, करणारही नाही. काँग्रेससारख्या विरोधी पक्षांनीही कधी अशी टीका केली नाही. ती आमच्या मित्र पक्षांनी केली. जर, मोदी यांच्याविषयी जर, अशी टीका होणार असेल तर, असं सरकारच कसं चालवायचं, असा प्रश्न आमच्यापुढं आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com