
Devendra Fadnvis : अटक करण्याचे आदेश वळसे पाटलांचे नव्हते तर...; फडणवीसांच्या उत्तराने सस्पेन्स वाढला
मविआ सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
फडवीसांच्या तात्कालिन महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या या आरोपानंतर तत्कालीन गृहमंत्री राहिलेले राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा फडणवीसांनी मला अटक करण्याचे आदेश वळसे पाटलांचे नव्हते म्हणत सस्पेंस वाढवला आहे. (Devendra Fadnvis On Dilip Walase Patil)
CM शिंदेंनाही याची माहती..
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी माध्यमांना बोलताना सांगितले की, हे मी अतिषय सत्य सांगितलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात कशाही प्रकारे मला कारागृहात टाकण्याचा तसेच माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होता.
याची सुपारी तत्कालिक मुंबईचे पोलिस कमिशन संजय पांडे यांना देण्यात आली होती. त्यांनी प्रयत्न करून पाहिले पण ते यशस्वी झाले नाहीत. यातली काही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील आहे. फर्स्ट हॅंड इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे आहे असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी
हेही वाचा: Devendra Fadanvis : फडणवीसांना गोड बोलतात म्हणून हलक्यात घेऊ नका; जयंत पाटलांचा भाजपला सल्ला
दिलीप वळसे पाटील यांनी हे आरोप फेटाळल्याबद्दल फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले की, मी वळसे पाटलांवर कुठलाही आरोपच केलेल नाहीये. हा जो आदेश आला होता तो वळसे पाटलांकडून आलेला नव्हता. तो वरून आलेला होता असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, त्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा: फडणवीसांच्या आरोपाचं माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडून खंडण