devendra fadanvis on Uniform Civil Code nana patekar cm eknath shinde
devendra fadanvis on Uniform Civil Code nana patekar cm eknath shinde

Devendra Fadanvis: समान नागरी कायदा आला पहिजे का? पाटेकरांच्या प्रश्नाला फडणवीसांचं थेट उत्तर, म्हणाले..

मुंबई: राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना चर्चेत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामुलाखती दरम्यान लोखसंख्या नियंत्रणासाठी समान नागरी कायदा यायला हवा असं वाटतं का? असा थेट प्रश्न मुलाखतकार अभिनेते नाना पाटेकर यांनी फडणवीस विचारला.

"समान नागरी कायदा आपल्या संविधाननाने डायरेक्टिव प्रींसिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये सगळ्या राज्यावर टाकली आहे. गोवा असं एकमेव राज्य आहे जेथे समान नागरी कायदा आहे, आता उत्तराखंडमध्ये देखील येतोय. काही लोकं या कायद्याचे चूकीचे अर्थ लोकांना सांगतात. समान नागरी कायदा आला म्हणजे तुमचं आरक्षण जाणार आहे. मग शेड्यूल कास्टला आरक्षण मिळणार.. काही संबंध नाहीये," असं फडणवीस यांनी सागितंलं.

devendra fadanvis on Uniform Civil Code nana patekar cm eknath shinde
Shivsena: 'ढाल-तलवार' चिन्हाचा इतिहास! आधीचा अख्खा पक्षच झाला होता काँग्रेसमध्ये विलीन

फडणवीस पुढे म्हणाले की, "समान नागरी कायद्याचा एकच अर्थ आहे, वेगवेगळ्या गोष्टीसांठी वेगवेगळे कायदे आहेत. एक देश-एक समाज-एक कायदा असा समान नागरी कायदा संविधान तयार केलं तेव्हा आंबेडकरांना ते अपेक्षित होतं. म्हणून त्यांनी डायरेक्टिव प्रींसिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये लिहीलंय की समान नागरी कायद्यासाठी राज्य प्रयत्न करेल, अजून आपण आणू शकलो नाहीये पण आला पाहिजे आणि येईल" असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

devendra fadanvis on Uniform Civil Code nana patekar cm eknath shinde
Amazon Sale: OnePlus 10R फोनवर मिळतेय बंपर सूट! जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com