Devendra Fadnavis News : काँग्रेसच्या नेत्यांना संविधानाबद्दल बोलायचा अधिकार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

devendra fadanvis Latest News

काँग्रेसच्या नेत्यांना संविधानाबद्दल बोलायचा अधिकार नाही - देवेंद्र फडणवीस

मुंबई : काँग्रेसच्या नेत्यांना संविधानाबद्दल बोलायचा अधिकार नाही. संविधानाचे सर्वाधिक उल्लंघन काँग्रेस सत्तेत आल्यानंतर झाले आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानाला सर्वतोपरी मानतात. बायबल, कुराणापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान महत्त्वपूर्ण असल्याचे मानतात, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

भाजप संविधान तोडत आहे. यामुळे काँग्रेस चार दिवस संविधान बचाव यात्रा काढणार आहे, असे पत्रकाराने देवेंद्र फडणवीस यांनी विचारले. याला उत्तर देताना त्यांनी वरील भाष्य केले. काँग्रेसला काम उरलेले नाही. त्यांच्या नेतृत्वाचा पत्ता नाही. यामुळे ते काम शोधत आहे, असेही उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले.

हेही वाचा: Monsoon Session : कामकाज दिवसभरासाठी तहकूब; महागाई व जीएसटीवरून गदारोळ

इंदूरवरून अंमळनेरकडे येणाऱ्या एसटीला धार जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसच्या चालक-वाहकासह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी बेपत्ता आहे. या संदर्भात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी संपूर्ण प्रशासन पाठवून कारवाई सुरू केली. ते आमच्या संपर्कात आहे. त्यांचे आभार मानतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तात्काळ सर्व प्रशासन पाठवून कारवाई सुरू केली आहे. आम्ही गिरीश महाजन यांना तत्काळ इंदूरला रवाना केले आहे. ते सर्व व्यवस्था तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी मदत करतील. मृत आणि बेपत्ता असलेल्यांची माहिती मिळावी यासाठी जळगावमध्ये सर्व व्यवस्था उभारली आहे. इथे नातेवाईक संपर्क करून माहिती घेऊ शकतात. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सामील आहोत. बेपत्ता लोकांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: शिवसेनेला मोठा धक्का : माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा राजीनामा

जाणीवपूर्वक पाच पट रक्कमेचे वाटप केले गेले

एक शिष्टमंडळ मला भेटले आहे. त्यांनी जो जीआर काढला होता. तोच जीआर तारीख बदलून काढला आहे. बजेट न पाहता पाच पाच पट वाटप केले गेले. ते अर्थातच रद्द करावे लागणार आहे. मागील सरकारच्या शेवटच्या काळात जाणीवपूर्वक पाच पट रक्कमेचे वाटप केले गेले. त्याबद्दल निर्णय घ्यावा लागणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आम्ही योग्य निर्णय घेऊ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल त्याचे पत्र मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी त्याबद्दल निर्णय घेऊ. राजकीय हस्तक्षेप करून निवडणुका पुढे ढकलल्याचा आरोप जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला होता. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. आम्ही योग्य निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

Web Title: Devendra Fadnavis Accident Indur Madhya Pradesh Attempts Locate Missing Persons

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..