esakal | केदारनाथबाबा नरेंद्रप्रमाणे देवेंद्रलाही पावणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis along with wife visits Kedarnath temple

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या निवडणुक निकालापूर्वी केदारनाथबाबाच्या दर्शनासाठी गेले आहेत.

केदारनाथबाबा नरेंद्रप्रमाणे देवेंद्रलाही पावणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डेहराडून : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या निवडणुक निकालापूर्वी केदारनाथबाबाच्या दर्शनासाठी गेले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे केदारनाथबाबा देवेंद्र फडणवीस यांनाही पावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल उद्या (ता.24) रोजी जाहीर होणार आहे. या आधीच देवेंद्र फडणवीस आपली पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी केदारनाथ येथे गेले आहेत. त्यांनी केदारनाथ येथे पूजा केली आहे. यापूर्वी नरेंद्र मोदी यांनीही लोकसभा निवडणूक झाल्यानंतर 18 मे रोजी येथिल गूफेत ध्यानधारणा केली होती. हा मोठा चर्चेचा विषय ठरला होता. पूजा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महादेवाच्या दारात आपले छायाचित्र काढले. 

दरम्यान, उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात होणार असून साधारणतः दुपारी दोन वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्रासोबतच हरियाणा राज्यातही 21 ऑक्टोबर रोजी मतदान झाले असून हरियाणा राज्याची मतमोजणीही उद्याच आहे. दरम्यान, एक्झिट पोलचे अंदाज आले असून त्यामध्ये भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे म्हटले आहे.

 

loading image