मूठभर लोकं देशभक्त मुसलमानांना बदनाम करताय - भाजप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

"मूठभर लोकं देशभक्त मुसलमानांना बदनाम करताय"

त्रिपुरामध्ये मुस्लीम समुदायावर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज राज्यातील वेगवेळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाला नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि अमरावतीमध्ये गालबोट लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये काही ठिकाणी पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली आहे. त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर बोलताना राज्य सरकारला या प्रकरणाची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील याची काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. "त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार चिंताजनक असल्याचे म्हणत, राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!" अवाहन त्यांनी राज्य सरकारला केलं आहे.

हेही वाचा: राज्यात हिंदुंना दाबण्याचा प्रयत्न केला तर मोर्चे काढू ; नितेश राणे

विदेशात घडलेल्या एखाद्या घटनेचे भारतात पडसाद उमटावेत, हे न कळणारे समीकरण असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. "काही मूठभर लोकं देशभक्त असणाऱ्या मुसलमानांनाही बदनाम करण्याचे काम करतात, त्यांना भारतीय मुस्लिम समुदायाने धडा शिकवला पाहिजे आणि योग्य तो समज दिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवणारं सरकार केवळ नावापुरते म्हणायचं. शिवरायांच्या काळात प्रजा अतिशय सुखी होती, त्यांना रयतेच्या मनातलं कळायचं. राज्य सरकारचा निर्दयीपणा उघड पडला आहे. तुमच्याकडून सुरू असलेला प्रकार अमानवीय आहे. यापूर्वी असे कधीही राज्यात घडले नव्हते." असं म्हणत त्यांनी सरकारवर देखील टीका केली आहे.

loading image
go to top