
फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला; मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहे की...
औरंगाबाद : संभाजीनगरवर बाळासाहेब ठाकरेंचे विशेष प्रेम होते. मात्र, या मुख्यमंत्र्यांना याचे काहीही देणेघेणे नाही. मुंबई आणि एमएमआर रिजनच्या बाहेर त्यांना काहीच माहिती नाही. यामुळे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहे की नाही असा प्रश्न निर्माण होते, असा हल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केला. (Devendra Fadnavis attacks Uddhav Thackeray)
राज्य सरकारने एक नवा पैसा दिलेला नाही. आपल्या खिशातून काहीच केले नाही. केंद्र सरकारने दिलेल्याच पैशांचा वापर केला. केंद्राकडून आलेल्या पैशातूनच काम करतात. औरंगाबाद, संभाजीनगर हे मराठवाड्याचे मुख्यालय आहे मुख्यमंत्र्यांना माहितीच नाही. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व खांदेश महाराष्ट्राचा भाग आहे याची त्यांना कल्पनाच नाही. म्हणून त्यांनी एक रुपयाही दिला नाही, अशी टिका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.
हेही वाचा: पूनावाला म्हणाले, काय चूक झाली व काय बरोबर झाले हे सर्वांना माहितीये
विद्यमान सरकारने (Uddhav Thackeray) समांतर पाणी योजनेचा सत्यानाश केला आहे. सरकार बदलल्यावर या सरकारने पाणी योजनेचे टेंडर बदलले. टेंडरला उशीर झाल्यानेच काम झालेले नाही. ज्या गतीने काम चालत आहे, त्या गतीने काम पूर्ण व्हायला पुढचे २५ वर्षे लागतील, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
पुढचे २५ वर्षे आमचेच सरकार राहणार असे शिनसेनेचे खासदार संजय राऊत घमंडाने सांगतात. त्यांचे हे वाक्य बहुतेक ठेकेदाराने ऐकली आहे. यामुळेच ते काम करीत नाही आहे. काम केले नाही तरी चालते अशी त्यांची समज झाली आहे. कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही, हे लक्षात ठेवायला हवे. निवडणुकीत जनता सरकारला त्यांची जागा दाखवेल, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
Web Title: Devendra Fadnavis Attacks Uddhav Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..