देवेंद्र फडणवीसही देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

देवेंद्र फडणवीस आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये ते घोषणा करण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप भाजपकडून किंवा फडणवीस यांच्याकडून काहीही माहिती मिळू शकलेली नाही.

मुंबई - अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

महाविकासआघाडीचा मास्टरप्लॅन; पवारांकडे नेतृत्व 

देवेंद्र फडणवीस आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये ते घोषणा करण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप भाजपकडून किंवा फडणवीस यांच्याकडून काहीही माहिती मिळू शकलेली नाही.

राज्यात सत्तास्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी राज्यपालांकडे केला आहे. राज्यपालांना 162 आमदारांच्या सह्यांचे पत्र देण्यात आले. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला होता. आता बाळासाहेब थोरात यांच्याकडेच गटनेतेपद देण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis chanes to resign