
मुंबई : पुण्यात शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या हल्ल्यानंतर आता या प्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या हल्ल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Devendra Fadnavis Reaction After Attack On Somaiya)
याबाबत त्यांनी ट्वीट केले असून त्यात ते म्हणाले आहेत की, राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही! महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका, असे आवाहन करत त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. (Political Reaction On Attack On Somaiya In Pune)
या घटनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील निषेध केला आहे. ते म्हणाले की, मुद्दे संपले की, माणूस गुद्द्यांवर येतो असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, पाया खालची वाळू घसरली तर माणूस बेफाम होतो त्याला कळत नाही की, आपण काय करतो. मुद्दे संपले की, माणूस गुद्द्यांवर येतो. यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. आम्ही बांगड्या भरल्या नाहीत आमचा कायद्यावर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.