Sharad Pawar : "मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो...", फडणवीसांची शरद पवार, सुप्रिया सुळेंवर टीका

देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह महाविका आघाडीतील नेत्यांवर टीका केली
Devendra Fadnavis  Sharad Pawar
Devendra Fadnavis Sharad Paware sakal
Updated on

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह महाविका आघाडीतील नेत्यांवर टीका केली. नागपूर येथे भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते .

राजकीय पक्ष रोज भूमिका बदलत आहेत. राज्यात उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी तसेच काँग्रेस यांना समाजाची चिंता नाहीये. यांना केवळ सत्तेच्या राजकारणात आपलं अस्तित्व कसं टिकवता येईल येवढीच यांची कारवाई मर्यादित झाली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत आज राज्यात आंदोलने सुरू आहेत. आपण मराठा आरक्षणाचा इतिहास पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवार यांनी. अगदी मविआ सरकारमध्ये देखील सुप्रिया सुळेंचं वक्तव्य ऐकलं, मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? त्याच्या पेक्षाही महाराष्ट्रापुढे मोठे प्रश्न आहेत असं बोलून पुढे निघून जाणाऱ्या सुप्रिया ताई... ज्यांना वारंवार ही संधी मिळाली होती. त्यांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला तेव्हा, सर्वोच्च न्यायालयाचे वेगवेगळे निवाडे आले त्याच्या आधी कोण कुठल्या यादीत आहे विचारत देखील नव्हतं तेव्हा देखील देता आलं असतं. पण त्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं. त्यांना फक्त समाजाला झुंजत ठेवायचं होतं, लोकं झुंजत राहिलं तर आपल्याकडे नेतेपद येईल म्हणून ते समाजाला झुंजवत ठेवतात, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis  Sharad Pawar
Pune Crime News : धक्कादायक! पुण्यात पाळीव कुत्र्याला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

आपलं सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते हायकोर्टात टिकवून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयात आपलं सरकार असेपर्यंत ते टिकलं, सरकार गेल्यानंतर स्थगिती आली असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोकं होते. ओबीसींना आरक्षण देऊ नये म्हणून मंडल आयोगाच्या विरोधात होते.

Devendra Fadnavis  Sharad Pawar
Dhiraj Sahu On IT Raid: ३५३ कोटींची रोकड सापडल्यानंतर धीरज साहू यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, पैसा काँग्रेसचा नाही तर...

मंडल आयोगाला विरोध करणारे उद्धव ठाकरे होते. भुजबळ का बाहेर पडले होते? कारण त्यावेळी तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता. पण आपला भूमिका पक्की आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण करत आहोत. कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही ही आमची कमिटमेंट आहे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Companies Closure Row
Devendra Fadnavis on Shiv Sena and NCP Party Ownership
Eight Sharad Pawar Faction MPs Meet PM Narendra Modi Delimitation Bill Talks Add Fuel to Political Speculation
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Marathi News Esakal
www.esakal.com