
'पुढील 25 वर्ष आमचचं राज्य'; राऊतांच्या विधानाचा फडणवीसांनी घेतला चांगलाच समाचार
औरंगाबाद : पाणी प्रश्नावरून औरंगाबाद शहरातील राजकारण चांगलंच तापलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो भाजप कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले. रिकाम्या घागरी, हंडे हातात घेऊन महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात (Shivsena) जोरदार घोषणाबाजी केली.
भाजपच्या मोर्चात उंटांवर, ऑटो रिक्षावरही रिकाम्या घाबरी बांधण्यात आल्या होत्या. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट इशारा दिलाय. ‘आम्ही सत्ता बदलायची तेव्हा बदलू, आता भ्रष्टाचाऱ्यांची भ्रष्ट व्यवस्था बदलायची आहे’, असा घणाघात फडणवीस यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले, या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना संभाजीनगरशी काही घेणं-देणं नाहीय. मात्र, संभाजीनगरमध्ये पाणी पोहोचल्याशिवाय भाजप तुम्हाला झोपू देणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय.
हेही वाचा: Indian Army : कुपवाडच्या जवानाचं पश्चिम बंगालात निधन
यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांच्यावरही टीका केलीय. संजय राऊत म्हणतात की, पुढील 25 वर्ष आमचचं राज्य आहे. त्याचं हे बोलणं एका ठेकदारानं एकलं आणि 25 वर्षे काम नाही केलं तर चालतं, अशी त्यानं भूमिका घेतली, त्यामुळं संभाजीनगरचा विकास खुंटला आहे. कोणीही किती राज्य आमचं आहे म्हणू दे, पण, कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नाहीय. जो- जो जनतेच्या विरोधात जाईल, त्यावेळी ही जनता त्याला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा फडणवीसांनी राऊतांना दिला आहे.
Web Title: Devendra Fadnavis Criticizes Sanjay Raut At Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..