Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Devendra Fadanvis: उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन संथगतीने सुरू असलेल्या मतदानावर आणि निवडणूक आयोगावर आणि भाजपवर हल्लाबोल केला त्यानंतर फडणवीसांनी ठाकरेंना उत्तर देत सोशल मिडीयावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisEsakal

महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. काही वेळात ती संपणार आहे. आज सकाळपासून राज्यातील १३ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 48.66% इतके मतदान झाले आहे. मतदानाच्या संथ गतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी यांनी गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाकडे मतदानाची गती वाढवण्यासाठी विनंती केली आहे. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन संथगतीने सुरू असलेल्या मतदानावर आणि निवडणूक आयोगावर आणि भाजपवर हल्लाबोल केला त्यानंतर फडणवीसांनी ठाकरेंना उत्तर देत सोशल मिडीयावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे.

उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू झालं, पराभव समोर दिसत असल्याने मोदींवर त्यांनी टीका केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधकांना मतदान होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर विलंब लागत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता, असं म्हणत ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Devendra Fadanvis
Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

पोस्टमध्ये काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस?

मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत.

माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका.

Devendra Fadanvis
Pune Accident News: पुण्यातील हिट अँण्ड रनप्रकरणी पोलिसाचं निलंबन? गृहमंत्र्याचे कठोर कारवाईचे आदेश; हे आहे कारण

पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते उध्दव ठाकरे?

मुंबईमध्ये अनेक मतदान केंद्रांवर गैरप्रकार सुरु असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की, निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत आहे. मतदान केंद्रांवर कसलीही सोय केलेली नाही. तरीही मतदार रांगेमध्ये उभे आहेत.

''पराभव समोर दिसत असल्याने मोदी सरकार अशा कुरापती करत आहे. मतदान केंद्रावर दिरंगाई झाल्यास जवळच्या आमच्या शाखेमध्ये मतदारांनी संपर्क साधावा. जिथे गैरप्रकार झालेला आहे तिथल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची आयडी कार्ड बघा, नावं विचारा.. ती नावं मी स्वतः जाहीर करणार आहे. शिवाय त्यांच्याविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत.'' असं आवाहन ठाकरेंनी मतदारांना केलं आहे.

Devendra Fadanvis
Pune Accident Updates : 'त्या' अल्पवयीन आरोपीचा अपघातापूर्वीचा पबमधला व्हिडीओ आला समोर; पब चालकासह इतरांवर गुन्हे दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com