फडणवीसांनी चालवलेली 'ती' २ कोटींची गाडी बिल्डरची; काँग्रेसने सांगितलं गाडी मालकाचं नाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde and Devendra Fadnavis

फडणवीसांनी चालवलेली 'ती' २ कोटींची गाडी बिल्डरची; काँग्रेसने सांगितलं गाडी मालकाचं नाव

मुंबई - Mercedes-Benz G350d Details: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा’ पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची देखील माहिती दिली. दौऱ्यादरम्यान स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी चालवलेली गाडी चर्चेचा विषय ठरली. मात्र आता काँग्रेसने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Mercedes-Benz: फडणवीसांनी समृद्धी महामार्गावर चालवलेल्या २ कोटींच्या गाडीत काय आहे खास? जाणून घ्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीच स्टेअरिंग स्वतः फडणवीसांनी हाती घेतल्याने दुपारपासूनच गाडींची चर्चा सुरू झाली होती. या दौऱ्याचे त्यांचे फोटो देखील समोर आले आहेत. फडणवीस यांनी चालवलेली गाडी Mercedes-Benz G350d होती. फडणवीसांनी स्वतः ५०० किमी ही गाडी चालवली. या गाडीची किंमत २ कोटीहून अधिक असल्याचं सांगण्यात येत असताना आता ही गाडी बिल्डरची असल्याचा दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बिल्डरची गाडी चालवतायत मग आता राज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार का? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसच्या फेसबुकवरून करण्यात आला आहे. यावेळी पेजवर काही फोटो शेअर करण्यात आले आहे. त्यामध्ये गाडी कोणाच्या नावावर आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे आता नवीन वाद उभा राहण्याची शक्यता आहे. फोटोवरून ही गाडी कुकरेजा इन्फ्रास्ट्रकर या नावाने असल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचा Swasthyam 2022: प्राणायाम करताना या सात गोष्टी लक्षात ठेवा

Mercedes-Benz G350d एसयूव्ही पॉवरफुल इंजिनसह येते. यामध्ये ३.० लिटरचे ६ सिलेंडर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ९-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. इंजिन १२००-३२०० आरपीएमवर ६००एनएम टॉर्क आणि ३४००-४६०० आरपीएमएवर २८१.६ पॉवर जनरेट करते. विशेष म्हणजे ही एसयूव्ही अवघ्या ७.४ सेकंदात ताशी ० ते १०० किमीचा वेग पकडू शकते. तर याचा बूट स्पेस ४८० लीटर आहे.