गृहखातं फडणवीसांकडे? 15 ऑगस्टपर्यंत होणार मंत्रीमंडळ विस्तार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde - Devendra Fadnavis

गृहखातं फडणवीसांकडे? 15 ऑगस्टपर्यंत होणार मंत्रीमंडळ विस्तार

मुंबई - महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन होऊन महिना उलटून गेला. तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. यावर विरोधक सातत्याने हल्लाबोल करत आहेत. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे नेते मागील अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचं सूत्र ठरवण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, 15 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: CM तिसऱ्या रांगेत, राष्ट्रवादीच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर; म्हटलं स्वाभिमानाच्या...

सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीमुळे सरकाराचा मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याचा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, रविवारी दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अंदाज फेटाळला आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचं ते म्हणाले. मंत्रिमंडळाचा विस्तार तुमच्या विचारापेक्षा लवकर होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

फडणवीस म्हणाले की, राजकारणासाठी दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जात आहेत. अधिकाऱ्यांना यापूर्वीही अर्ध-न्यायिक अधिकार देण्यात आले आहेत. मागील सरकारच्या काळात अनेक मंत्र्यांनी सचिवांना अधिकार दिले होते. राज्यातच नाही तर देशात ही परंपरा आहे. मुख्यमंत्री हा जनतेचा आहे आणि मी त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. या राज्यातील जनतेसाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत.

हेही वाचा: आझमींना महाराष्ट्राबाहेर फेकलं पाहिजे; 'त्या' विधानावरून संभाजीराजे संतप्त

वृत्तसंस्थेनुसार, दिल्लीत भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आठवड्यात (१५ ऑगस्टपर्यंत) मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकतात. शिंदे आपल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात सुमारे 15 मंत्र्यांचा समावेश करू शकतात. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते दिले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: Devendra Fadnavis Home Ministry Cabinet Expansion To Be Held Till August 15

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..