अबू आझमींना महाराष्ट्राबाहेर फेकलं पाहिजे; 'त्या' विधानावरून संभाजीराजे संतप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sambhaji raje chhatrapati says abu azmi should be thrown out of maharashtra over his statment on aurangzeb

आझमींना महाराष्ट्राबाहेर फेकलं पाहिजे; 'त्या' विधानावरून संभाजीराजे संतप्त

राज्यात शहराच्या नामांतरानंतर औरंगाबाद शहराचं नान‘संभाजीनगर’ करण्यावरून काही दिवसांपासून राजकारण केलं जात आहे. यादरम्यान समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी खळबळजनक विधान केलं. औरंगजेब बादशाह हा वाईट माणूस नव्हता, त्याचा खरा इतिहास जेव्हा समोर येईल तेव्हा हिंदू समाजही ते मान्य करेल, असं विधान त्यांनी केलं, यावरून छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार टीका केली आहे.

संभाजीराजे यांनी याबाबत ट्वीट केलं असून त्यामध्ये त्यांनी "औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात राहण्याचा अधिकार नाही." असे म्हटले आहे. यासोबतच शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांनी अबू आझमी महाराष्ट्रात का राहतायत? असा सवाल देखील केला आहे. अशा व्यक्तीला सर्वात आधी महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: CM तिसऱ्या रांगेत, राष्ट्रवादीच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर; म्हटलं स्वाभिमानाच्या...

हेही वाचा: OnePlus चा सर्वात स्वस्त फोन लॉन्च, किंमत १६ हजारांहून कमी

अबू आझमी काय म्हणाले होते?

औरंगजेब बादशाह वाईट माणूस नव्हता. त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. जर त्यांचा खरा इतिहास समोर आला तर हिंदू नाराज होणार नाहीत. देशभरात अनेकांची नाव औरंगजेब आहेत. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद, अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यांची नावं मुस्लीम व्यक्तीच्या नावावरुन आहेत. या जिल्ह्यांची नाव बदलल्यानं कोणाला नोकऱ्या मिळणार नाहीत. महागाई कमी होणार नाही. जर ही नाव बदलून तरुणांना नोकऱ्या मिळणार असतील तर मी या बदलाचं स्वागत करेन, आझमी म्हणाले आहेत.

Web Title: Sambhaji Raje Chhatrapati Says Abu Azmi Should Be Thrown Out Of Maharashtra Over His Statment On Aurangzeb

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..