'ती' घटना जालियनवाला बाग हत्याकांड, फडणवीसांचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

Devendra fadnavis-Sharad Pawar
Devendra fadnavis-Sharad Paware sakal

मुंबई : पुणे जिल्ह्यातील मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर या सरकारने गोळीबार केला होता. अशा गोळीबार करणाऱ्या लोकांना असं आंदोलन करण्याची नैतिकता आहे का? मावळ येथे झालेली घटना जालियनवाला बाग हत्याकांड होता, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर (NCP president Sharad Pawar) नाव न घेता निशाणा साधला आहे.

Devendra fadnavis-Sharad Pawar
आजचा बंद म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद - फडणवीस

सरकारने सर्व योजना बंद केल्या. कोरोनाच्या काळात देश सुरू होता. त्यावेळी महाराष्ट्र बंद केला. आता गरीबांची गाडी रुळावर येत होती. तेव्हा महाराष्ट्र बंद केला. लखीमपूरची घटना ही गंभीर आहे. पण, महाराष्ट्रात राजकीय पोळी शेकण्यासाठी हा बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सरकार ढोंगी असून धमक्या देत हा बंद पुकारण्यात आला आहे, असेही फडणवीस म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले होते?

गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील लखमीपूर खिरी येथे हिंसाचार झाला होता. यामध्ये चार शेतकरी ठार झाले होते. त्यानंतर राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेसने निदर्शने केली. तसेच उत्तर प्रदेशातील घटनेवर अनेकांनी टीका केली आहे. केंद्र सरकार या घटनेची अद्यापही जबाबदारी घेऊन कारवाई करत नाही, असा आरोप केला जातो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या घटनेवरून भाजप सरकारवर कडाडून टीका केली होती. तसेच ही घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड असल्याचे म्हटले होते. त्यावरूनच आता देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com