शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 December 2019

आम्हाला मिळालेल्या जनादेशाचा मित्रपक्षाने विश्वासघात केला असून शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. शिवसेना काँग्रेससोबत जाईल असं वाटलचं नव्हतं. शिवसेनेवरच्या अतिविश्वासामुळेच सत्ताही गमावली असल्याचेही फडणवीस यांनी मान्य केले.

मुंबई : आम्हाला मिळालेल्या जनादेशाचा मित्रपक्षाने विश्वासघात केला असून शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. शिवसेना काँग्रेससोबत जाईल असं वाटलचं नव्हतं. शिवसेनेवरच्या अतिविश्वासामुळेच सत्ताही गमावली असल्याचेही फडणवीस यांनी मान्य केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अजित पवार शरद पवार (काका)शी बोललो असल्याचे म्हणाले म्हणूनच त्यांच्यावर विश्वास ठेवला असल्याचेही फडणवीस यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. आम्हाला मिळालेल्या जनादेशाचा मित्रपक्षाने विश्वासघात केला असून निवडणुकीत आमचा पराभव नाही, लढलेल्या 67 ते 70 टक्के जागा आम्ही जिंकल्या असल्यामुळे विजय हा आमचाच झालेला आहे. निवडणुकीत आमचा पराभव झालेलाच नाही, असेही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केले.

ज्येष्ठ कथाकार सखा कलाल यांचे निधन

फडणवीस म्हणाले, 'सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंनी विरोधकाची भूमिका घेतली, त्यामुळे काही गोष्टी लक्षात आल्या नाहीत. तसेच, शिवसेनेने बाळासाहेबांचे विचार हे गुंडाळून तर ठेवलेच पण आमचा सगळ्यात मोठा अपेक्षाभंग शिवसेनेने केला असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपला वेगळं पाडायचे हे शिवसेनेने ठरवलंच होतं असंही त्यांनी सांगितले. 

2019 ची निवडणूक आम्ही महायुतीत लढलो, त्याला राज्याच्या जनतेने स्पष्ट बहुमत दिले. तरीही शिवसेनेने मिळालेल्या जनाधाराचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत आम्ही ज्या जागा लढलो त्यातल्या 105 जागा आम्हाला मिळाल्या. आम्हाला यापेक्षा जास्त जागा अपेक्षित होत्या. 164 पैकी 130 जागा येतील अशी अपेक्षा होती. मात्र, आमच्या 105 जागा आल्या. मात्र, याला आम्ही पराभव म्हणणार. जनादेश आमच्याजवळ होता, मात्र आमच्या मित्रपक्षाने जनादेशाचा विश्वासघात केला त्यामुळे आम्हाला विरोधात बसावं लागलं असं देवेद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis interview clarifies about Shivsenas Support