ज्येष्ठ कथाकार सखा कलाल यांचे निधन 

Story Writer Sakha Kalal No More
Story Writer Sakha Kalal No More
Updated on

कोल्हापूर - समाजातील वास्तव अत्यंत गांभिर्याने कथेतून मांडणारे ज्येष्ठ कथाकार सखा कलाल यांचे आज राहत्या घरी  निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.

त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुले, मुलगी असा परिवार आहे. त्यांनी लिहिलेल्या "सांज', "ढग' या कथासंग्रहांनी साहित्यिक क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांच्या संवेदनशील आणि गंभिर लिखाणामुळे साहित्य वर्तुळात त्यांचे नाव आदराने घेतले जायचे. 

कलाल यांचा अल्पपरिचय

कलाल यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथे 10 डिसेंबर 1938 साली झाला. शिक्षणासाठी कलाल कोल्हापुरात आले. शिक्षण संपल्यानंतर त्यांनी काही काळ शिवाजी विद्यापीठात लिपीक म्हणूनही काम केले. ग्रंथालयशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीका प्राप्त केल्यानंतर ते ग्रंथपाल म्हणून कॉमर्स कॉलेजमध्ये रुजू झाले. ग्रंथापल म्हणून काम करत त्यांनी आपला वाचन, लेखनाचा छंद जोपालसा. कात ही त्यांनी 1959 साली प्रकाशित झालेली कथा लोकप्रिय झाली. या कथेला राज्यसरकारचा पुरस्कारही मिळाला. "सांज' आणि "ढग' या दोन कथासंग्रहातून त्यांनी सुमारे 28 कथांचे लेखन केले. त्यांचा अप्रकाशीत कथांची संख्याही अधिक आहे. ग्रामिण भागाचे अचूक चित्रण, नातेसंबंधांवर मार्मिक पण जबाबदारीने केलेली टिप्पणी आणि संवेदनशिलता हे त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या कथांचे आकाशवाणीवर क्रमश: वाचनही झाले होते. पार्टी हा ललितसंग्रही त्यांनी लिहीला. 1960 नंतर मराठी भाषेतील कथाकारांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या रुपाने संवेदनशिल लेखक गेल्याची भावना साहित्यवर्तुळातून उमटली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Social Reforms: MAnis Announces State-Level Awards for Dedicated Rationalist Activists
six people killed in Maharashtra Karnataka border land dispute vijapur chadchan crime
Crime
Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Marathi News Esakal
www.esakal.com