Devendra Fadnavis : लोकशाही मार्गानं आंदोलन करा, हिंदूंच्या सणात खोडा नको, मुख्यमंत्री फडणवीसांचे जरांगेंच्या आंदोलनावर भाष्य
Summary
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण आंदोलन लोकशाही मार्गाने करण्याचे आणि हिंदूंच्या सणात अडथळा न आणण्याचे आवाहन केले.
त्यांनी आंदोलकांना छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून संयम व सभ्य भाषा वापरण्याची सूचना दिली.
फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपांना उत्तर देत सांगितले की, एकनाथ शिंदे आणि ते दोघे एकत्र आहेत व कोणत्याही मतभेदात नाहीत.
मराठा आरक्षणासाठी आंदोलक जरांगे पाटील यांनी मुंबईत २९ ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाष्य केले आहे. "लोकशाही मार्गानं आंदोलन करा, हिंदूंच्या सणात खोडा नको, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.