
Maharashtra Politics: राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात बैठक होत आहे. मुंबईतल्या हॉटेल ताज लँड्समध्ये उभय नेत्यांची भेट होत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार, अशा चर्चा सुरु असताना दुसरीकडे राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.