CM Devendra Fadnavis Interview
easkal
नरेंद्र मोदी यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी कधीही पंतप्रधान पदाचा विचार केला नाही आणि पुढे करण्याचाही नाही असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे. नुकताच सकाळ समुहाद्वारे देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली होती. यावेळी त्यांनी याबाबत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिकाही स्पष्ट केली.