Devendra Fadnavis : राजकीय मतभेद दूर करणे सोपे पण...; ठाकरेंसोबतच्या युतीबद्दल फडणवीसांची गुगली

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray :लोकसभा निवडणूकांसाठी देशातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यादरम्यान पक्षांतर्गत हालचालींना प्रचंड वेग आला आहे.
Devendra Fadnavis on friendship with uddhav thackeray shiv sena UBT bjp alliance lok sabha election politics
Devendra Fadnavis on friendship with uddhav thackeray shiv sena UBT bjp alliance lok sabha election politics esakal

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूकांसाठी देशातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यादरम्यान पक्षांतर्गत हालचालींना प्रचंड वेग आला आहे. बड्या राजकीय पक्षांकडून नव्या साथीदारांचा शोध देखील घेतला जात आहे. यातच महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा जुना जोडीदार असलेली उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? हा प्रश्न देखील विचारला जात आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

टीव्ही चॅनल एबीपी लाइव्हच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले की, राजकीय मतभेद असतात, ते दूर करणे सोपे असते. तुमच्या आणि आमच्या काही मुद्द्यांवर मतभेद असतील तर कॉमन ग्राउंड तयार करून आपण एकत्र येऊ शकतो. येथे आमचं मन दुखी आहे. येथे फक्त राजकीय मतभेद नाहीत. दिवस-रात्र, सकाळ-संध्याकाळ, ते आणि त्यांचे लोक आमचे नेते पीएम मोदी यांना शिव्या देतात, हे आमचे विरोधक देखील करत नाहीत, तर मला वाटत नाही की आम्ही एकत्र येऊ शकतो. याबद्दल काही प्रश्नच उद्भवत नाही.

Devendra Fadnavis on friendship with uddhav thackeray shiv sena UBT bjp alliance lok sabha election politics
Suhani Bhatnagar Death : 'आमिरनं आमच्या मुलीला लक्षात ठेवले हीच मोठी गोष्ट'! 'दंगल' फेम सुहानीच्या आईला अश्रू अनावर

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, आमचं मन दुखी आहे, आम्ही मनातून दुखावले गेलो आहेत. त्यांच्यासोबत एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांनी एक-दोन वेळा मोदींची स्तुती केली असेल तर माहिती नाही, मात्र दिवसात झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत १० ते २० शिव्या मोदींना दिल्या नाहीत तर त्यांना अन्न पचत नाही. त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आहे. आम्ही आमच्या वाटेने जात आहोत.

उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या मैत्रीविषयी विचारले असता फडणवीस म्हणाले की, मित्र तो असतो जो एकमेकांमध्ये काही पटत नसेल, तर फोन करून असं सांगण्याची हिंमत दाखवली पाहिजे की हे नाही होऊ शकणार. ज्यावेळी आपण युतीबाबत बोलणी सुरू होती, त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री बनायचं होतं. मी पाच वर्षे मुख्यमंत्री होतो, ते आमचे साथीदार होते.

Devendra Fadnavis on friendship with uddhav thackeray shiv sena UBT bjp alliance lok sabha election politics
Rahul Gandhi News : राहुल गांधींना झारखंड हायकोर्टाचा मोठा झटका! अमित शाहांविरोधातील टिप्पणी भोवणार?

ते पुढे म्हणाले, आम्ही त्यांच्याशी (उद्धव ठाकरे) रात्रंदिवस बोलणं होत असे आणि जेव्हा युतीबद्दल बोलणी झाली तेव्हा फोनवर येऊन देवेंद्रजी तुमच्यासोबत जायचे नाही, असे सांगण्याचे सौजन्यही त्यांच्याकडे नव्हते. त्याने दरवाजा बंद केला. त्यामुळे उद्धव ठाकरे मित्र आहेत की नाही, हा प्रश्न त्यांना विचारावा लागेल. त्यानंतर आमच्यात औपचारिक बोलणे झाले नाही, जेव्हा-जेव्हा समोरासमोर आम्ही भेटतो तेव्हा दुआ-सलाम होत राहातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com